म्हणून स्वराज्य जननी जिजामाता मालिकेची TRP वाढली .. जाणून घ्या कारण ..

0
31

स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सध्या रंगतदार वळणावर चालली आहे . मालिकेत नवनवीन पैलू समोर येत आहेत. त्यातच मालिकेची प्रसिद्धी सध्या जास्त होऊ लागली आहे .

मालिकेची टीआरपी देखील वाढत आहे. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जगभर प्रसिद्ध झाली होती . जगदंब क्रिएशन्स निर्मित स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे . स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनु मोघे या मालिकेत राजमाता जिजाऊ यांचे पती शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत दिसत आहेत .

शंतनु मोघे यांच्यामुळे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्रेक्षक वर्ग सध्या स्वराज्य जननी जिजामाता मालिकेकडे वळला आहे . त्यात “दिवेश मेदगे” हा कलाकार देखील स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे . स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील बाळ शंभूराजे यांची भूमिका साकारली होती .

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते “अमोल कोल्हे” हे स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत एका विशिष्ट भूमिकेत दिसून आले यामुळे अमोल कोल्हे यांचा चाहता वर्ग आता स्वराज्य जननी जिजामाता मालिकेकडे वळला आहे .

सध्या मालिका काही वर्षं पुढील भाग दाखवत आहे . त्यामुळे मालिकेतील कलाकार बदलले गेले आहेत . आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील कलाकार जगदंब क्रिएशन्स ने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये आणले , त्याने मालिकेच्या प्रसिद्धीवर भर पडला आहे .

यामुळे स्वराज्य जननी जिजामाता मालिका लोकप्रिय झाली आहे तर पाहायला विसरू नका
“स्वराज्य जननी जिजामाता” सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता सोनी मराठी वाहिनीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here