स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत दिवेशच्या भूमिकेतील काही फोटोज…

0
51

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून “दिवेश मेदगे” प्रेक्षकांच्या समोर आला . स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत बाळ शंभूराजे यांच्या भूमिकेत दिवेश मेदगे याने अतुलनीय अभिनय केला . दिवेशने अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले , त्यानंतर आता दिवेश आपल्या भेटीला पुन्हा येणार आहे .

स्वराज्य जननी जिजामाता मालिका सौ – सोनी मराठी वाहिनीवर आपल्या भेटीला येत आहे .
अवघ्या लहान वयातच दिवेश याने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आपला उत्तम अभिनय सादरीकरण करून मोठे शंभूराजे म्हणजेच अमोल कोल्हे यांच्या अभिनयाला प्रश्नचिन्ह निर्माण होईल ह्या उच्चतम दर्जेचा अभिनय सादर केला .
दिवेशने आतापर्यंत झी मराठी वरील स्वराज्य रक्षक संभाजी त्यानंतर स्टार प्रवाह मधील विठूमाऊली आणि अश्या अनेक मराठी सिरीयल मध्ये बाल कलाकार म्हणून आपली भूमिका साकारली . त्यानंतर तो आता आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या सिरीयल मध्ये दिसणार शिवाजी महाराज भूमिकेत दिसणार आहे.

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे .काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत एका विशिष्ट भूमिकेत दिसले .

दिवेश हा कोल्हापुरात एका लहान गावात राहणारा बालकलाकार आहे तो आपल्या अभ्यासा सोबतच समतोल राखून अभिनयातही उत्तम कारकीर्द गाजवत आहे ह्या वर्षी दहावीत असताना दिवेश ला 90% गुण प्राप्त झाले होते .
दिवेश याने अभिनय आणि शिक्षण अगदी उत्तम रित्या सांभाळले आहे .

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान ‘दिवेश मेदगे’ याचे वय तेरा वर्ष होते आणि आता स्वराज्य जननी जिजामाता ही सिरीयल सुरू झाले तर आता त्याचे वय अवघे सोळा वर्ष इतके आहे .

प्रेक्षकांना हे पाहायला आणखी उत्साह वाटेल स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अतुलनीय भूमिका साकारून दिवेश हा स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत पाहायला मिळणार आहे .
प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे तर पाहायला विसरू नका , ‘स्वराज्यजननी जिजामाता’ सोनी मराठी वाहिनीवर ,
सोमवार ते शनिवार
रात्री 8.30 वाजता …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here