स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत आता या अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत..

1
35

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर मातोश्री आणि स्वराज्याचा पाया ज्यांनी रोवला त्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या भूमिकेत आत एक नवीन चेहरा दिसणार आहे
जिजामाता ही भूमिका साकारणं आणि तितक्याच ताकतीने पेलन हे खूप अवघड आणि हेच शिवधनुष्य पेलण्याच काम भार्गवी चिरमुले यांनी स्वीकारले .
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शंभुराजांना पोवाडा ( आम्ही जिजाऊंच्या मुली ) म्हणून दाखवला ती अभिनेत्री आता स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत जिजामाता यांची भूमिका साकारणार आहेत.


स्वराज्य जननी जिजामाता एका मूलखावेगळ्या आईची गाथा
भार्गवी चिरमुले – जन्म: 29 मार्च 1978ह्या एक मराठी अभिनेत्री आहे. यांनी अनेक मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेल आहे.
भार्गवी ही आजच्या पिढीतील मराठी कलाकारांमध्ये कायम उल्लेखनीय आहे. कास आणि वन रूम किचन सारख्या चित्रपटात गंभीर प्रकारची भूमिका करण्यासोबतच तिने रिअल्टी शोमध्ये कॉमेडी फु बाई फू मध्येही काम केले.

भार्गवी चिरमुले ह्या उत्कृष्ट कलाकार आहेत सोबत उत्तम आवाज शैली . ह्या आधी अमृता पवार यांनी जिजामाता यांची भूमिका उत्तम वठवली होती . आता प्रेक्षकांना हे पाहायला अमृता पवार यांनी उत्तम साकारल्या प्रमाणे भार्गवी ह्या कश्या साकारतात
स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत आता सतत तुम्हाला भारावून टाकणारे प्रसंग सामोरे येतील , नवनवीन इतिहासातील पात्र आणि त्यांचे पात्र साकारणारे कलाकार
तर पाहायला विसरू नका स्वराज्य जननी जिजामाता फक्त सोनी मराठी वर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता

भार्गवी हिने मराठी चित्रपट सृष्टीत संदुक , वन रन किचन , मोलकरीण बाई , लालबत्ती , सासू चा स्वयंवर , धागे दोरे , इश्क वाला लव्ह , चिरंजीव , अनवाट , मेनका उर्वशी ह्या चित्रपटांत उत्तम भूमिका साकारली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here