शंतनू मोघे आता स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत दिसणार या भूमिकेत..

6
50

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते शंतनु मोघे हे आता आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे .

शहाजीराजे यांच्या भूमिकेत आपल्याला शंतनू मोघे सर दिसणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शंतनु मोघे यांनी आपली भूमिका उत्तम रित्या साकारली .

आपल्या अभिनयाच्या बळावर शंतनु मोघे यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून शंतनु मोघे यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले . आता प्रेक्षकांना पहायला खूप उत्साह वाटत असेल कि शहाजी राजे यांच्या भूमिकेत शंतनु मोघे पुन्हा आपल्या नजरेस पडतील . शंतनु मोघे बरोबरच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील बाळ शंभूराजे यांची भूमिका साकारणारा दिवेश मेदगे ही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे . स्वराज्य जननी जिजामाता मालिका सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते .

भारदस्त आवाज उंच शरीर आणि अभिनयाची उत्तम शैली लाभलेले असे शंतनु मोघे आता प्रेक्षकांना शहाजीराजे यांच्या भूमिकेत दिसणार आहे . थोड्याच दिवसापूर्वी आपल्याला अमोल कोल्हे स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत एका विशिष्ट अभिनयात दिसले आणि आता आणि दिवेश मेदगे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील कलाकार आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहेत . प्रेक्षकांनी नक्की पहा स्वराज्य जननी जिजामाता सोनी मराठी वाहिनीवर

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here