बाळ शंभूराजे म्हणजेच दिवेश मेदगे आता स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत दिसणार या भूमिकेत..

3
40

दिवेश मेदगे हा मराठी कलाकार स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून सर्वांच्या समोर आला . स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत बाळ शंभूराजे यांच्या भूमिकेत दिवेशने अतुलनीय अभिनय सादर केला . दिवेशने अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते , त्यानंतर आता दिवेश आपल्या भेटीला स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून मुख्य भूमिकेत दिसणार आहे .

दिनांक 3 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणाऱ्या स्वराज्य जननी जिजामाता मालिका सौ – सोनी मराठी वाहिनीवर रात्री साडेआठ वाजता आपल्या भेटीला येत आहे .
अवघ्या लहान वयात दिवेशने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आपला अतुलनीय अभिनय सादर करून मोठे शंभूराजे म्हणजेच अमोल कोल्हे यांच्या अभिनयाला प्रश्नचिन्ह निर्माण होईल ह्या उच्च दर्जेचा अभिनय सादर केला .
दिवेश ने आतापर्यंत स्वराज्य रक्षक संभाजी त्यानंतर विठूमाऊली आणि अश्या अनेक मराठी सिरीयल मध्ये बाल कलाकार म्हणून आपली भूमिका साकारली आहे . त्यानंतर तो आता आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या सिरीयल मध्ये दिसणार आहे .

कालच्या भागात अमोल कोल्हे आपल्याला स्वराज्य जननी जिजामाता या मालिके मध्ये एका विशिष्ट भूमिकेत दिसले होते त्यानंतर आजच्या भागात म्हणजे दिनांक 4 सप्टेंबर रोजी दिवेश मेदगे आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार आहेत .
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दिवेश मेदगे याचे वय तेरा वर्ष होते आणि आता स्वराज्य जननी जिजामाता ही सिरीयल सुरू झाले तर आता त्याचे वय अवघे सोळा वर्ष आहे.

दिवेश हा कोल्हापुरात एका लहानग्या गावात राहणारा बालकलाकार आहे तो आपल्या अभ्यासा बरोबरच समतोल राखून अभिनयातही कारकीर्द गाजवत आहे यंदाच्या वर्षी दहावीत असताना दिवेश ला 90% गुण प्राप्त झाले होते .
दिवेश याने अभिनय आणि शिक्षण अगदी उत्तम रित्या सांभाळले आहे .
प्रेक्षकांना हे पाहायला आणखी उत्साह वाटेल स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अतुलनीय भूमिका साकारून दिवेश हा स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे तर पाहायला विसरू नका स्वराज्य जननी जिजामाता सोनी मराठी वाहिनीवर , सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता.

3 COMMENTS

  1. जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे 🙏🙏🙏सगळ्या सीरियलमध्ये प्रत्येकाचा अभिनय हा वाखाणण्याजोगा आणि खूप छान झालेला आहे त्यामुळे यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here