स्वराज्य जननी जिजामाता लेखमालिका: ४ सप्टेंबर २०२०

0
49

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 4 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, एकीकडे महाराज साहेब शहाजीराजेंनी संकल्पलेले स्वराज्य संकल्पनेतून सत्यात उतरवण्याच्या विचारांनी पछाडलेल्या जिजाऊ…पुण्यात येऊन काळ लोटला तरी लोकं साधं भेटायला आणि मुजरा करायला येत नाहीत ते वारंवार बोलावून सुद्धा गोतसभेला कसे येणार…आदिलशाही दहशत कशी काढावी? चेतना कशी चेतवावी लोकांच्या मनात?या विचाराने चिंताक्रांत असतात..तर दुसरीकडे जिजाऊंच्या संस्कारांचे बालकडूच प्यायलेले शिवबा “आम्ही ती पहार उखडून टाकणार..आणि आदिलशाही दहशत संपवणार”असा निर्धार बाजी काकांकडे व्यक्त करतात…जिजाऊंना या बोलांनी खरोखरच आदिलशाही दहशत संपवून नवी चेतना निर्माण होईल हे मर्म उमगले…आणि त्याचवेळी जनावरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गोमाजी बाबांना तिथे आणले जाते..गोमाजी बाबांची मलमपट्टी करताना गोमाजी बाबा “तुम्ही धाकल राजे आम्ही रयत” म्हणून शिवबांना थांबवतात…तर त्यावर शिवबा म्हणतात…”मग तर आम्ही तुमची काळजी घेतलीच पाहिजे… आणि आम्ही तुमच्या अंगा खांद्यावर इतके खेळलोय की आमच्या हाता पायाचे ठसे उमटलेले दिसतात…
आम्ही आमच्याच जखमांवर मलमपट्टी करतोय”…वयापेक्षा मोठं शहाणपण पाहून गोमाजी बाबा धन्य होतात…मलमपट्टी करून शिवबा जिजाऊंच्या कडे जातात तर तिकडे जिजाऊ महाराज साहेबांनी दिलेल्या कवड्यांच्या माळेसोबत निर्धाराने बोलत असतात…त्यांना महाराज साहेबांचे बोल आठवतात की “शिवबांना प्रजाहितदक्ष राजा बनवा”आणि त्यांच्या डोळ्यात चमक येते…शिवबा विचारतात “काय बोलत होता”…तेव्हा मनातला मानस सांगण्यासाठी गोमाजी बाबा आणि बाजी काकांनाही बोलावतात…बाजी काका पवित्रा घेऊनच येतात चाहूल लागली की काय कोणाची? या विचारात…त्यावर जिजाऊ सांगतात “होय, उजेडाची चाहूल लागलेय… लोकांच्या मनातला आदिलशाही पहारीच्या दहशतीचा काळोख दूर करून विश्वासाचा उजेड निर्माण करायचा…तो एक हुंकार आसेल… दवंडी द्या आजपासून तीन दिवसांनी आमचे शिवबा ती पहार उखडून फेकून देणार अशी”…
आता जिजाऊंच्या नव्या युगारंभाच्या निर्धाराने जिजाऊंसमोर काय नवीन आव्हान उभे राहणार…मिया अमीनची पुढची खेळी काय असणार… हे पाहण्यासाठी पहात रहा…
स्वराज्यजननी जिजामाता.. सोम-शनि.. रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here