आत्तापर्यंत स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलेत की,
शिवबांनी स्वकष्टाने… महाराज साहेबांनी पाठवलेली कवड्यांची माळ धारण करण्यास पात्र ठरत…ती कवड्यांची माळ कमावली होती…आशा, विश्वास, निष्ठा, आशीर्वाद आणि लोकमान्यता या गोष्टी मिळवण्यासाठी… जिजाऊंच्या संस्कारांचा कस लागला होता…आणि शिवबांनी हर कसोटी पार केली होती…
त्यासाठी मावळातुन गरीब शेतकरी बाबाच्या शेतात काम करत…”आशा” मिळवली होती…कपटी बटव्यातील कपट उघड करण्याचा विश्वास देत…तात्याबाची गृहशोभा अब्रूदार राखून…कृष्णवत द्रौपदीची चिंधीरुपी “विश्वास” मिळवला होता…मात्र जिजाऊंनी दिलेली वेळमर्यादा हातुन निसटून जात होती…पाच दिवसातील उरलेला एक दिवस आणि निष्ठा, आशीर्वाद आणि लोकमान्यता प्राप्त करावयाचे आव्हान शिवबांसमोर येऊन उभे ठाकले होते…
परंतु धीरोदात्त धोरण आखत…आमीनच्या गुहेत शिरण्याचा धाडसी निर्णय शिवबांनी घेतला होता…
मात्र एका अन्यायग्रस्त म्हातारीच्या सुटके खातर तो वेळही व्यर्थ घालवला गेला होता…शिवबांना सगळ्या गोष्टींहून आऊसाहेबांचे संस्कार मोठे वाटत होते…
त्यासाठी कवड्यांची माळ बंगळुरूला परत पाठवावी लागली तरी…बेहत्तर…अशी शिवबांची धारणा होती…कसोटीस न उतरू शकल्याने शिवबांना अतीव दुःख झाले होते परंतु झाला उलगडा काही औरच होता…शिवबांच्या खचल्या मनाला उभारी देत…सोनोपंत यांनी स्वतःची शिवबांप्रति असलेली “निष्ठा” त्या अन्यायग्रस्त म्हातारीच्या रूपाने जिजाऊंच्या समोर हजर केली होती…
आमीनच्या फासातून शिवबांनी मुक्त केलेल्या त्या म्हातारीने जिजाऊंसमक्ष तोंड भरून “आशीर्वाद” दिले होते…जे घडत होतं ते सारं काही पाहून बाजी काकांचा उर अभिमानाने असा काही फुलला होता की…त्यांना सोनोपंतांना त्यांच्याच बोलांची आठवण करून द्यावी लागली…बाजी काका हरखून म्हणाले…”एक राजा घडताना पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं…”शिवबाराजे” मुजरा स्वीकारा”… बाजी काकांचे अनुसरण सोनोपंत आणि तिथे उपस्थित सगळ्यांनी केले… त्या झडलेल्या मुजऱ्याने…शिवबांचे शिवबाराजे झाले होते…ते मुजरे नव्हते ती होती…”लोकमान्यता”…
जिजाऊंच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते…
शिवबांच्या गळ्यात ती कवड्यांची माळ घालणे सोपे होते…परंतु त्यांनी त्या माळ मध्ये “व” ओवला… “मावळ” …आपल्या जहागिरीची ओळख शिवबांना व्हावी या एका गोष्टी खातर…हे धोरण जिजाऊंच्या मनाने आखले होते…शिवबांच्या गळ्यात कवड्यांची माळ घालून…जिजाऊं आनंदून गेल्या होत्या…शिवाय,
मिया अमीनने उत्पन्न केलेल्या संकटांच्या आगीत शिवबा तावून सुलाखून बावन कशी सोन्यासारखे लकाकले होते…वेगळेच…
लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.