विघ्नहर्ता गणरायाच्या प्रतिष्ठापनेला मिया अमीनच विघ्न..लेखमालिका भाग ६ :१० सप्टेंबर २०२०

0
19

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 10 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
आदिलशहाची नियत फिरली होती…ज्या आदिलशाहीला मावळातल्या घरादाराच्या धडधडत्या होळीचा आणि आयबायांच्या कंठातून फुटलेल्या दयेच्या हंबरड्याचा आवाज ऐकून खुशी मिळायची…त्याच आदिलशाहीची दहशत संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात एक स्त्री असूनही जिजाऊ यशस्वी झाल्यामुळे… त्याच आदिलशहाचा, वजीर मुस्तफाखानचा आणि मिया आमीनचा अहंकार दुखावला होता…

आणि त्यामुळे कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापना करायला निघालेल्या जिजाऊंचा कसलाच अगदी कसलाच मुलाहिजा ठेऊ नये असा आदेश मिया अमीनला मिळाला होता…
आणि हीच बातमी बंगळूरूला शहाजीराज्यांपर्यत पोहचली होती… आदिलशहाच्या समक्ष जिजाऊंबद्दल बोलताना जिभेचा लगाम सैल सोडणाऱ्या मुस्तफाखानला तलवार लावून शहाजीराजे कडाडले होते…”औरतो का सम्मान करणे का संस्कार हमारे खून में है।जो तुम्हारे खून में नहीं है।” आदिलशहाच्या दरबारी सोडलेला संयम हा अविचार होता…हे शहाजीराज्यांच्या ध्यानात आले होते..

आणि त्यामुळे जिजाऊंच्या आडचणींमध्ये वाढ होणार हे जाणून…कसबा गणेशाची प्रतिष्ठापना रहित करून जीवितास धोका करणाऱ्या या धाडसी निर्णयापासून परावृत्त करावे असे सोनोपंत सुचवतात…

तर पुण्यातील ठाकर शास्त्रींच्या वाड्यात प्राणप्रतिष्ठापना करण्याचा धाडसी निर्णय जिजाऊ धडसानेच पूर्ण करणार होत्या…झाम्बरे पाटीलांच्या वाडयात मंगल उधाण आले होते…केलेला निर्धार…घेतलेला निर्णय जिजाऊ मोठया आनंदाने सत्यात उतरवणार होत्या…इतक्यात, मिया अमीन तिथे येतो…जिजाऊंच्या जिद्दीने मंगल पर्वाला सुरुवात होणार होती…पण मिया आमीनच्या येण्याने अडथळा निर्माण झाला होता…काय करावे कसे बाहेर पडावे या विचाराने झाम्बरे पाटील आणि पाटलीनबाईंच्या पोटात खड्डा पडला होता…


शत्रू दाराशी वाट पाहत बसला असताना आपण भेकडासारखं लपून राहायचं हे जिजाऊंना पटत नव्हते….”तलवार आपल्याही हाती आहे…बघूच तो काय करतो” असे म्हणत तलवार उपसून शिवबा हत्यारबंद हशमांशी दोन हात करण्याची ही तयारी दर्शवतात…परंतु “सगळीकडे तलवारच चालवायची नसते…तर बुद्धी ही चालवायची असते…संयम सोडला की अविचार जागा होतो…आणि ते आपल्या साठी घातक ठरू शकतो…”


असे म्हणून जिजाऊ त्यांना रोखतात… घातपात घडवण्याच्या हेतूने आलेल्या मिया आमीनच्या डोळ्यात धूळ फेकून निसटण्याचा मार्ग जिजाऊ निवडतात…प्राण प्रतिष्ठा घटिका जस जशी जवळ येत होती…तसतशी ठकर शास्त्री वाड्यात गोमाजी बाबा आणि बाजी काकांना आमीनच्या कुरापतीची चाहूल लागते… पण त्यांना तसा विश्वासही होता जिजाऊ नक्की येणार…मुहूर्त टळणार नाही असा…आणि तेच झाले…मिया आमीनच्या दहशतीची खिल्ली उडवून जिजाऊ आणि शिवबा ठकर शास्त्री यांच्या वाड्याकडे मार्गस्थ झाले होते…


आता मिया आमीनच्या अहंकाराला जिजाऊ कशाप्रकारे धुळीस मिळवणार…आणि मंगलमूर्ती कसबा गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करून कसे मंगल घडवणार हे पाहण्यासाठी…पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता..फक्त सोनी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here