स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 12 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
मिया अमीन ठकार शास्त्रींच्या वाड्यात पोहचला होता…जिजाऊ आणि शिवबांच्या सुरक्षेच्या धास्तीने गोमाजी बाबा, बाजी काका, झाम्बरे पाटील सगळेच जण आपापल्या परीने जिजाऊंना तिथूनही निसटून जावे अशी विनवणी करत होते… परंतु,एकदा दिला तर तो चकवा नाहीतर तो पळपुटेपणा… आणि तेच जिजाऊंना नको होतं…
ठकार शास्त्रींच्या वाड्यात ठरल्या मुहूर्तावर… जिजाऊंनी कसबा गणपतीची स्थापना करून..मिया आमीनच्या अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करत त्यांनी त्यांच्या एक स्त्री असूनही निडर, साहसी, जिद्दीवृत्तीचे दर्शन घडवले होते…आधी निडर होऊन आदिलशहाच्या पहाररूपी दहशतीस शिवबांकर्वी उखडून फेकले होते…त्याच्या चेतावणीला मोठ्या सहसाने सामोऱ्या जाऊन…चेतावणीस सडेतोड प्रत्युत्तर देत कसबा गणरायाची स्थापना करून जिद्दीवृत्तीचे दर्शन दिले होते… मात्र, आता मिया आमीनला सामोरं जायचं होते….शिवबांनी देखील तलवार उपसून दुजोरा दिलाच होता..
आदिलशहाच्या दरबारी फर्जंदाचा अधिकार असलेल्या शहाजीराज्यांच्या राणीसाहेब आणि पुण्याच्या जहागिरीच्या मालकीनबाई यांच्याशी आदिलशहाच्या नोकराने कसं बोलायचं असतं याची तमीज.. शिकून.. तो खालमानेनं त्याचा ढोबळ निर्धार चाचपडू लागला… त्यातच, शिवबांनी बतावणी केली…की, “आबासाहेबांनी सोनोपंत काकांची पाठवलेली फौज लवकरच पोहचणार आहे.”.. आणि जिजाऊ आणि शिवबांच्या समोर मिया आमीनच्या तलवारीची उरली सुरली धारही बोथट झाली…तर
तिकडे बंगळुरूला शहाजी महाराज साहेबांना पुण्यातील सगळा वृत्तांत समजला होता…त्यांच्या राणीसाहेबांनी आरंभलेल्या दिव्याचा त्यांना मोठा अभिमान वाटत होता…
शिवाय शिवबांनी मारलेल्या बतावणीवरून शिवबांची बुद्धिमत्ता त्यांनी जोखली…आणि शिवबांनी केलेली बतावणी आपण खरी करु आणि पुण्यास मनुष्यबळ पाठवावे असे आदेश दिले… तर जिजाऊंनी पुण्यातील परिस्थिती जोखली होती…मिया अमीनला ललकारले जाऊ शकतं आणि अजूनही लोकांच्या मनात असलेली भीती गेली नाही हे जिजाऊंच्या लक्षात आलं होतं…आणि त्याच उद्देशाने हळदीकुंकू समारंभ ठेऊन इतर स्त्रियांचे मनपालट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता…
मात्र घरदारावरून नांगर फिरण्याच्या…लोकमान्य भीतीने… मिया अमीनला न जुमाणलेल्या जिजाऊंच्या पदरी निराशा पडली होती…तर दुसरीकडे मिया अमीन सूडबुद्धीने जळत होता…जिजाऊंच्या अडचणीत आप्तस्वकीयांच्या कारस्थानांची वाढ करण्यासाठी वतनदार देशमुख आणि वतनदार कुलकर्णी यांना हाताशी घेतले होते…
आता जिजाऊंच्या अडचणींमध्ये वाढ करण्यासाठी वतनदार देशमुख कुलकर्णी काय खेळी आखणार…आणि आप्तस्वकीय परंतु निर्ढावलेल्या शत्रूंना जिजाऊ कशी मात देणार…हे पाहण्यासाठी..पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर