लेखमालिका भाग २ : ५ सप्टेंबर २०२०

0
34

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, जिजाऊंच्या निर्धारी बोलण्याने झाम्बरे पाटील, गोमाजी बाबा, आणि बाजी काका भारावून तर जातात…शिवाय, दवंडी देऊनी आव्हान देत पहार उखडून टाकल्याने मिया आमीनचा रोष पत्करावा लागेल..तो सावध होईल..पुण्याच्या तट बुरुजातून बाहेर येईल… हे हितकर नाही..असा सल्लाही जिजाऊंना देतात…पण, जिजाऊ रणचंडी भासाव्या अश्या आविर्भावात जे होईल ते होईल…वाजत गाजत पहार पुण्याच्या वेशीवर ठोकली आहे तर ती वाजत गाजतच काढायची…या दवंडीने रानावनात दडलेल्या, पहार भीतीने पिचलेल्या लोकांना एक विश्वास मिळेल..आपण आत्मसन्मानाचा शट्टू ठोकायचा म्हणजे ठोकायचाच…तलवारी परजून घ्या…आता चाकोरीबद्ध जगणे शक्य नाही…असे म्हणतात…

तर दुसरीकडे मिया अमीन त्याच्या फकरुद्दीन पंत या सेवकाला पुण्याचा हाल हवाल विचारतो.. फकरुद्दीन पंत त्याला वादळा पूर्वीच्या शांततेचा आभास होतोय असा इशारा देत..जिजाऊ पहारीला हात घालण्याचं धाडस करू शकतात असे सांगतो… मिया अमीन त्याच्या ह्या बोलण्याने चिडतो…आदिलशाही दहशतीचे बीज म्हणजे ती पहार आहे….


आणि त्या दहशतीचे मूळ ह्या मातीत खोलवर रुजले आहे आणि रुजनार आहेत..पहारीकडे कुणी बघितले तरी त्याला महागात पडेल…असा फतवा काढून त्याचे जासुस पुण्यात पाठवण्यास सांगतो…
पण जिजाऊंनी आता ती पहार काढणं हेच जीवितलक्ष्य मानलं.. अजाण शिवबांना असं का हे समजत नव्हते… त्यांना समजवताना जिजाऊ म्हणतात..”ती पहार म्हणजे आदिलशाही हुकूम आहे..पुणे बेचिराख करत येणाऱ्या आदिलशाही फौजा… संसाराची राख करत, नांदती घरं जळती करत. आणि तरुण मुलींना उचलून नेत असलेले पाहिलेल्या, बेहाल होऊन परचक्रात भरडलेल्या लोकांनी… दहशत बसवणारी..हुकुमाची…ती दवंडी ऐकली आहे…त्यामुळे हे लोक एका हाकेत येणार नाहीत…त्यासाठी आपल्याला ही दहशत नीसुर करणारी दवंडी द्यावीच लागेल तरच लोकं एकत्र येतील आणि जिजाऊंनी तशी दवंडी दिली देखील…


ही दवंडी शिरवळ ला मिया अमीन पर्यंत पोहचताच त्याच्या मनात जिजाऊंच्या धोरणाबाबत शंका उत्पन्न झाली…एवढ्या सुखसोयी असताना जिजाऊ ओसाड पुण्यात काय म्हणून राहतायत? काय विचार आहे यामागे?असा सावधगिरी चा निर्णय घेत पहारीकडे लक्ष ठेऊन जर कोणी त्याला हात लावण्याचे धाडस केले तर हात पाय कलम करण्याचे आदेश देतो…

जिजाऊंच्या विश्वासार्ह दवंडीने मावळ प्रांतात एक दोन मनाला… नवलाई पसरून उजेडाची वेडी चाहूल लागते..तर दुसरीकडे मिया अमीन ने काढलेल्या फतव्याची चाहूल जिजाऊंना लागते…त्यावर बाजी काका आणि गोमाजी बाबा चिंताक्रांत होतात… मिया आमीनच्या जययत तयारी केली आहे…आता आक्रीत घडणार असा विचार करून…त्यावर जिजाऊ आत्मविश्वासाने म्हणतात…” आक्रीत तर घडणारच आहे… पण, ते आक्रीत कोण घडवणार…हे पुण्याची वेस बघणार…
पुण्याला नांदतं करण्याच्या हेतूने केलेला मानस… जिजाऊ शिवबांना सोबत घेऊन कसा सत्यात उतरवतात… हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता..सोम ते शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर
लेखक पूनम कुचेकर
मुंबई .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here