राजे शहाजींची संकल्पपूर्ती करण्या .. जिजाऊ बनणार मराठी मूलखाची प्रेरणा भाग ९ : १४ सप्टेंबर २०२०

0
67

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, हळदीकुंकू समारंभाला येण्यापासून स्त्रियांना रोखलं गेलं होतं…त्यातून उमगलेला निष्कर्ष जिजाऊ बाजी काकांना सांगत असतात…तेवढ्यात शहाजीराज्यांच्या आदेशानुसार सोनोपंत आणि दादोजी पंत झाम्बरे वाड्यात जिजाऊंच्या भेटीला येतात…

गाढवाचा नांगर फिरलेल्या, आदिलशहाच्या दहशतीची पहार ठोकलेल्या, पुण्यात अमीनला आव्हान देत श्रींची स्थापना केलेली पाहून…या भूमीचे बदलले रुपडे पाहून दोघेही जिजाऊंच्या धाडसाची दाद देतात…परंतु लोक अजूनही काही केल्या सोबत येत नाहीत..अशी खंत झाम्बरे पाटील व्यक्त करतात…यावर उपाय म्हणून “आपण मावळातल्या मातब्बर मंडळींना साद घालू, त्यांची मोट बांधू…म्हणजे लोकं त्यांच्या मागोमाग येतील.. जमतील..कारण त्याशिवाय आदिलशाही दहशतीच्या जात्यात भरडले जाण्याची लोकांची भीती जाणार नाही..”असं सोनोपंत सुचवतात…

जिजाऊंना हा विचार पटतो..आणि लगेचच जिजाऊंच्या मनात एक नवी उर्मी निर्माण होते…मातब्बर मंडळींना गोतसभेचे निमंत्रण देण्यासाठी निघता निघता… सोनोपंत जिजाऊंना महाराज साहेबांनी दिलेली भेटवस्तू देतात…


महाराजसाहेबांनी पाठवलेली भगवी पताका हातात घेताच हरखलेल्या जिजाऊंच्या… पत्नीमनाचा आरसा असलेले… महाराजसाहेब शहाजीराजे भगवी पताका होऊनच… जणू त्यांच्या समोर उभे ठाकले होते… ती पताकाच जणू महाराजसाहेबांचे मनोगत जिजाऊंना सांगत होती…जणू ते म्हणत होते…”खूप केलंत आमच्या स्वप्नासाठी, खूप करता आहात… सतत संघर्ष चालूच आहे तुमचा…पण आता एक करा…शिवबांना तुमचे धरलेले बोट सोडायला सांगा…”उद्याचा राजा तुमच्या मांडीवर खेळत आहे!!”त्यांना आता सगळं शिकवा…त्यांच्या गुरू व्हा..त्यांची सावली व्हा..”


दोन देह तरी स्वप्न एक असलेल्या जिजाऊंनी देखील त्या पताकेशी संवाद साधला होता…”तुमच्यामुळे या आदिलशाही वाऱ्यातही आम्हाला… पताका बनून फडकण्याची उर्मी मिळतेय…दमछाक होतेय परंतु आम्ही तुमचं हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करू…” असा विश्वास जिजाऊ स्वतःला आणि शहाजीराज्यांनी पाठवलेल्या पताकेला देत होत्या…
तर दुसरीकडे गोतसभेच्या आमंत्रणाला अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता… म्हणून बाजी काका आणि सोनोपंत गोतसभेचे आमंत्रण द्यायला थेट वतनदार कुलकर्णी देशमुख यांच्याकडे वळतात…


मात्र, मिया अमीनला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी… त्याच्याच पायाशी झोपवलेला त्यांचा स्वाभिमान…मुजोरीची घोंगडी पांघरून मरणासन्न होता… परंतु सोनोपंतांच्या आणि बाजी काकांच्या हुषारीमुळे..हजरजबाबी पणामुळे गोतसभेला हजर राहणाऱ्या चार दोन मातब्बरांमध्ये या दोघांची भर पडली होती…


जिजाऊंच्या पुण्यात येऊन कितीतरी काळानंतर…बारा मावळातल्या मातब्बरांसमवेत विचारांची देवाणघेवाण करणारी गोतसभा भरली होती…हीच सुरुवात होती…पुण्याचे गतवैभव परत आणणाऱ्या एका नव्या आरंभाची…पुणे पुन्हा वसवून मराठी मुलखाच्या पायाभरणीची…
“पुण्यात राहण्यास येण्याचं आवाहन करतानाच आपण गनिमाच्या तलवारी खाली मान द्यायची की आपल्या तलवारी खाली गनिमाची मान आणायची…हे ठरवण्याची आता वेळ आली आहे…”असे म्हणून जिजाऊंनी त्यांच्या मनाला उभारी उभारी दिली होती… परंतु, वतनदार देशमुख कुलकर्णी यांनी…पुणे ही गाढवाचा नांगर फिरलेली निषिद्ध भूमी आहे आणि या भूमीत परत येऊन निर्वंश होईल..असं म्हणत निर्धाराचा भंडारा उचलण्या आधीच साऱ्यांच्या हिमतीला तळाला नेऊन आमीनच्या बाजूनं कौल दिला…


स्वराज्याची पहिली घडी बसवता बसवता ती विस्कटली होती…जिजाऊ आता मात्र पुरत्या हतबल झाल्या होत्या…महाराज साहेबांनी दिलेल्या कवड्यांच्या माळे सोबत बोलताना…जिजाऊंच्या मनाला अतीव यातना होत होत्या…मात्र, “जमिनीवर बी फेकून काही होत नाही आधी जमीन नांगरावी लागते..मग पेरणी करायची असते.”. शिवबांच्या या बोलांनी जिजाऊंच्या खचलेल्या मनाने पुन्हा आशेच्या आकाशात उंच भरारी घेतली… आणि जिजाऊंच्या तोंडून प भवभाग्यशाली उद्गार निघाले…”पेरणी करायची असेल तर नांगर हाती धरावाच लागेल… तोही सोन्याचा फाळ असलेला…”


आता सोन्याचा फाळ आणि मराठी भाळ… पुण्याच्या निषिद्ध भूमीला कसे पावन करणार…हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम ते शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here