“महाराज साहेबांनी पाठवलेली कवड्यांची माळ ही केवळ भेट किंवा चीजवस्तू नाही तर ती एक जबाबदारी आहे… भाग २१ : २८ सप्टेंबर २०२०

0
43

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 28 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, मिया अमीनला ललकारणाऱ्या… शिवबांच्या धडकी भरवणाऱ्या नजरेने… त्यांच्यातल्या नरसिंहाची झलक दाखवली होती…खेडबाऱ्यात घडलेला हा प्रकार बंगळुरूला असलेल्या शहाजीराजे महाराज साहेबांना कळला होता…आणि हेच औचित्य साधून… जिजाऊंना पूर्वनियोजित..संकल्पित गोष्टींचा वेग वाढवण्याचा इशारा म्हणून… भोसले कुळीचे लेणं कवड्यांची माळ भेटस्वरूप पाठवून…शहाजीराज्यांनी शिवबांचे कौतुक केले होते…


परंतु,”महाराज साहेबांनी पाठवलेली कवड्यांची माळ ही केवळ भेट किंवा चीजवस्तू नाही तर ती एक जबाबदारी आहे…आणि ती कवड्यांची माळ धारण करण्यासाठी..हृदयात सत्व असावं लागतं…एकवेळ वैजंतीमाळ परवडली पण ही कवड्याची नाही परवडत…ते सत्व असेल तरच ही माळ छातीवर ठरते.. तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करून…ही अलौकिक माळ कमवावी लागेलं…आणि त्यासाठी कसोटीस उतरावे लागेल…”असे जिजाऊंनी शिवबांना सांगितलेच होते…शिवबांनीही त्या गोष्टीला दुजोरा देत “आम्ही नक्कीच कसोटीस उतरून आई भवानीचं देणं आणि भोसले कुळीचं लेणं कमावू…असा शब्द दिला…


पण त्यासाठी “पाच दिवसात…तुमची ओळख लपवून मावळ मुलुख पादाक्रांत करून…स्वकर्तुत्वाने आणि हिमतीने…आशा, विश्वास, आशीर्वाद,निष्ठा, लोकमान्यता या गोष्टी कमावून…आमच्यापुढे सादर करावी लागतील…असे न झाल्यास सहाव्या दिवशी ती कवड्यांची माळ बंगळुरूस परत पाठवण्यात येईल…शिवाय, याकाळात आम्ही तुमच्या आऊसाहेब नाही.. आमच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला ती माळ प्राप्त करावी लागेल …तसेच, कोणालाही तुमची ओळख पटली तर तुम्ही त्याक्षणी अपात्र व्हाल…”अश्या जाचक अटी नियमांचे आणि कठोर अंतःकरणाचे दर्शन जिजाऊंनी शिवबांना प्रथमतःच घडवले होते…


शिवबांसमवेत बाजी काकांनाही जिजाऊंच्या या पवित्र्यामुळे प्रश्न पडला होता…की,एवढं सगळं कशासाठी… हे सांगताना सोनोपंत यांनी…”महाराज साहेब आणि जिजाऊंचा निर्धार सत्यात उतरताना…आणि एक राजा घडताना पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे…” असा विश्वास बाजी काकांना दिला… “आदर्श राजा तोच ज्याच्याकडून लोकांना कल्याणाची “आशा” असते..तो आपलं रक्षण करेल असा लोकांना “विश्वास” वाटतो..आणि अश्याच राजाला प्रजा “आशीर्वाद” देते..आशीर्वाद देते कारण “निष्ठा” असते…
आणि या सगळया गोष्टी ज्यांच्या अंगी तोच “लोकमान्यता” प्राप्त करतो… अशी या गोष्टींची उकल ही केली…आणि


शिवबांच्या कसोटीची वेळ सुरू झाली होती…वेशबदल करून शिवबा आणि सोबत बाजी काका मावळ मुलखात फिरत असताना…लोकहिताचा कळवळा उपजतच असलेल्या शिवबांना…हशमांनी अन्यायग्रस्त करून …बैलं पळवून नेलेल्या…आणि नांगरणी थांबल्यामुळे…अवसानघात झालेल्या अवस्थेत शेतकरी बाबा दिसतात…त्यांना मदत करून मनाला उभारी देत…शिवबांच्या मनातील जिद्द.. फाळ ओढत.. खांद्यावर घेतलेल्या नांगराला…अनवाणी पायांनी बळ देत..घाम गाळून… शेत नांगरून काढण्यात…जिजाऊंनी सांगितल्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा वेळ वाया गेला… या भावनेने शिवबांचा चेहरा उतरतो…मात्र,शेत नांगरणी पूर्ण झाल्याने… शेतकरी बाबांचा चेहरा प्रफुल्लित होऊन शिवबांना… “तुज्या घामाचं थेंब कणसांला मोत्यासारखं लगडत्यात बघ…शेतकऱ्यांकड देण्यासारखं… असती ती फक्त जगण्याची आस…ती तेवढी घेऊन जा…असं म्हणत गळ्यातला ताईत काढून देतात…


मात्र, जिजाऊंना मोकळ्या हाती सामोरे आलेल्या शिवबांना.. घडल्या गोष्टीची पोहच नव्हती…
पण जिजाऊंनी ती गोष्ट जाणल्यामुळे… त्यांच्या डोळ्यात एक तेजस्वी “आशा” दिसली होती…
आता शिवबांनी कसोटीस उतरण्यासाठी…आऊपन बाजूला सारलेल्या जिजाऊंना…आणि हळव्या मनाला मारलेल्या शिवबांना…कोणती भावनिक दिव्ये पार पाडावी लागणार… हे पाहण्यासाठी… पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

लेखिका-पुनम कुचेकर,मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here