पहार उखडून सोडवला हा सूलतानी तिढा, शिवबाने उचलला “स्वराज्य स्थापनेचा” विडा… लेखमालिका भाग ४ : ८ सप्टेंबर २०२०

0
169

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 8 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
एकीकडे पुण्याच्या भाग्योदयाचा सोनेरी अक्षरात टिपण्यासारखा… दिवस तर उजाडला होता…मात्र, मुहूर्त घटिका भरली नव्हती…जणू त्या क्षणांची काळही प्रतीक्षा करत होता… पुण्याच्या वेशीवर… आदिलशाही दहशतीचे प्रतीक असलेली पहार… अजूनही जिजाऊंच्या निर्धाराला आव्हान देत उभीच होती…आणि शिवाय, मिया आमीनच्या सरदार हसनखानने झाम्बरे पाटीलांच्या नव्हे तर मराठी मुलखाच्याच मानेला तलवार लावून .. तिथे जमलेल्या थोड्या थोडक्या मनात जागा झालेला स्वाभिमान…आणि बहुकालप्रतिक्षेनंतर फुटलेला…

मराठी मुलखाच्या पायाभरणीचा आशेचा किरण… पायदळी तुडवू पहात होता…परंतु, जिजाऊंच्या डोळ्यातला अंगार कमी होण्याऐवजी तो सुर्यतेजासारखा फुलत होता…हातातली तलवार कसोशीने तळपण्यास आतुर झाली होती…आणि नजर उत्स्फूर्तपणे शिवबांच्या पावलांना परिवर्तनाच्या वाटेवर मार्गस्थ होण्यासाठी प्रेरणा देत होती…झाम्बरे पाटीलांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती…”राजे, उखडा ती पहार…” असा परिवर्तनाचा धोशा त्यांनी लावला होता…


संधी मिळताच जिजाऊंच्या तलवारीची सोबत करत गोमाजी बाबा आणि बाजी काका यांची तलवार खणखणाट करू लागली…आणि शिवबांचे पहारीकडे पडलेले प्रत्येक पाऊल हे आदिलशाही दहशत नीसुर करत होते…आणि घटिका भरली…सरदार हसनखानाचा मिजाज… जिजाऊंच्या तलवारीच्या टोकावर भीतीने हैराण झाला होता…आणि आता आई जगदंबा जिजाऊंच्या तोंडून बोलत होती…”शिवबा बघताय काय!! ही पहार आदिलशाही जुलमाचं प्रतीक आहे…

सुलतानाच्या धाक, दरारा आहे, तुमचे आबासाहेब धुळीस मिळाल्याची खून आहे, जो पर्यंत ती पहार आहे तो पर्यंत या भूमीवर दिवा नाही, देव नाही, उखडून टाका ती पहार…तोडून टाका ती तुटकी वहाण, भिरकावून द्या ते कवड्यांचं तोरण, द्या मराठी माणसाला विश्वास… द्या तुमची ओळख… जिजाऊंच्या शब्दां शब्दांनी शिवबांच्या रगारगांत एक ऊर्जा संचारत होती…शिवबांनी ती दहशत आवेशाने उखडून फेकली… जिजाऊंमुळे शिवबा मराठी मुलखाच्या सुटकेचा निश्वास ठरले होते…शिवबांच्या या अचाट कामगिरीने जाणत्या पासून नेणत्या पर्यंत सगळ्यांकडून शिवबांना मुजरे झडू लागले होते…जिजाऊंच्या डोळ्यातील स्वराज्य स्वप्नाला मात्र दिशा मिळाली होती…
तर दुसरीकडे,


आदिलशाही दहशत संपवून आपण त्याच्या शेपटावर पाय दिलाय..ही बाबही जिजाऊंच्या ध्यानात होती…बारा मावळात सणाचे स्वरूप आले होते… आणि झाम्बरे पाटील कसब्यातल्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे सुचवतात… जिजाऊ पहार काढल्याची बातमी गणपतीला हार घालून देऊ…असे म्हणतात…सगळीकडे चैतन्य निर्माण झाले होते…

तेवढ्यात, जिजाऊंच्या बंडाला प्रत्युत्तर देत…चवताळलेल्या मिया खानने पाठवलेले…हशमांच्या शिराचे नजराने त्याचा वकील घेऊन येतो…ही चेतावणी मोडीत काढत जिजाऊ पुन्हा कडाडतात…कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त परवा चा नाही उद्याचाच असणार…


आता जिजाऊ माघार न घेण्याचा विचार बदलतील का..आणि त्याचा परिणाम काय असेल हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता फक्त… सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here