स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, जिजाऊंनी पाठवलेले बहरत्या पुण्याचे स्वरूप…अंकुरित रोपटे पाहून मिया अमीन चिडला होता…जणू त्या पाठवलेल्या… अंकुरलेल्या…रोपट्यासारखंच ह्या पुण्याला.. “आम्ही दहशतीचे खडक फोडत, स्वाभिमानाची मुळे मावळ मातीत घट्ट रुतवत, स्वराज्याच्या आभाळात झेपावणारे वटवृक्ष होण्यासाठी बळ देऊ..”. हे सूचित करणार आव्हान…मिया आमीनच्या जिव्हारी लागलं होतं…
तर दुसरीकडे जिजाऊंनी कामाचा भरारा लावला होता…पुण्यात रहायला आलेल्या आपल्याच माणसांची नोंद, मोजदाद सगळं हिरीरीने करत होत्या…करायला लावत होत्या…त्यांना प्रतीक्षा होती, ती महाराज साहेबांनी पाठवलेल्या मदतीची…निघालेली मदत पोहचायला एक दोन दिवस वेळ होता…आपल्याच्या माय भूमीत परतल्यावर कुटुंब कबिले आनंदले होते…लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी जिजाऊंनी हर परिश्रम घेतला होता…परंतु सूड भावनेतून मिया आमीनचा पोटशूळ उठला होता…तर आदिलशहाच्या विश्वास घातकी पणा बळावला होता…
महाराज साहेबांनी पाठवलेल्या मदतीला हस्तगत करून जिजाऊंच्या आव्हानाला प्रतिउत्तर देण्याचे ठरवलेल्या…आणि शहाजी राज्यांच्या मुत्सद्दीपणाची आणि बुद्धिमत्तेची पोहच नसलेल्या… मिया अमीनने जिजाऊंना कोंडीत पकडण्यासाठी…जीवघेणी खेळी खेळली होती…पुण्यातील बाव, विहिरीत विष टाकून ते विषमिश्रित पाणी लोकांनी प्यायल्याने हाहाकार माजला होता…खरंतर माजवला होता…शिवाय, बाजी काकांचा चाळीस खनाचा वाडा जाळला होता…इथे बाजी काकांच्या वाड्याची ही गत झाली होती…तर “आमच्यासारख्या गोर गरिबांची काय गत होईल..”या विचाराने जिजाऊंना गाऱ्हाणे घातले जात होते…
परंतु, जिजाऊंनी अश्या परिस्थितीत ही धीर सोडला नव्हता… स्वतः धैर्याने लोकांना विश्वास देत होत्या… झाल्या प्रकाराची जबाबदारी घेत होत्या…काहींना पुणे सोडून जाण्यापासून शिवबांच्या बोलांनी रोखले होते… जिजाऊंच्या मनाला ठाऊक होते…की ही वेळ परीक्षा घेणारी आहे..केवढ्या धैर्याने आपण या गावकऱ्यांची मोट बांधलेय…पहार काढली तेव्हा लोक आले नाहीत…कसबा गणेश प्रतिष्ठापित केला तेव्हा आली पण भीत भीत…पण सोन्याच्या नांगराने…लोकं आली…
पुण्याच्या भूमीत लोक आक्रमक झाले…अमीन सारख्या जुलमी सरदाराला पळवून लावले…शस्त्र नव्हती तर दगड उचलले…पण हे धैर्य जर टिकवून ठेवायचे असेल तर महाराज साहेबांनी पाठवलेली मदत लवकरात लवकर यायला हवी…सोन्याच्या नांगराने ही पुण्याची भूमी नांगरली गेली ना…तेव्हा या गोरगरीबांच्या पाया खालून एक वीज सळसळली… आणि हेच लोक आनंदाने गाऊ लागले नाचू लागले… आणि म्हणूनच मिया अमीन त्रास देतोय…
पण या सगळ्याला आपण उत्तर द्यायलाच हवं…आणि ते ही सणसणीत… आणि म्हणूनच बसलेली घडी विस्कटली जाऊ नये यासाठी मदत लवकर आली पाहिजे…अशी अपेक्षा करून जिजाऊ..वाट पहात होत्या…परंतु , लोकाचा धीर सुटत चाललेला पाहून…जिजाऊंच्या निर्धाराला धीरोदात्तपणे पाठिंबा देत…बाजी काकांनी लोकांचेच नव्हे तर जिजाऊंच्या धैर्याला धीर दिला…परंतु, महाराज साहेबांकडून येणारी मदत…लुटली गेल्याने हातून सगळं निसटण्याची वेळ आली असतानाच…”मदत चोरीस गेलेय आमची जिद्द नाही…तुम्हाला मदत मिळणार…गावगाडा निर्धोक चालणार…असा जिजाऊ शब्द देतात…”
आता जिजाऊ गावगाडा निर्धोक करण्यासाठी काय करणार…आणि जिजाऊंच्या जिद्दीवृत्तीचे दर्शन कसे घडणार …हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम -शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठी वर…