जिजाऊंच्या संकल्पनेतून फिरवला सोन्याचा नांगर लेखमालिका भाग १४ : १९ सप्टेंबर २०२०

0
40

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 19 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
पुण्याच्या भूमीत सोन्याचा नांगर फिरल्याने सगळयांच्याच खुशीला उधाण आले होते…अखेर एकतेचा विजय झाला होता…सोन्याच्या नांगराची उभारणी करण्यात…ज्यांचा ज्यांचा हातभार लागला…सहभाग लाभला…त्या प्रत्येकाला जिजाऊंच्या हातून मानाचे कडे, वस्त्र आणि मान मिळत होता…ज्या लोकांना मिया अमीन काफिर शिवाय बोलत नव्हता ते लोक अलुतेदार, बलुतेदार म्हणून गौरवले जात होते…

ज्या जिजाऊंना शत्रूच्या पदरी असलेल्या शिरच्छेद झालेल्या पहारेकर्यांच्या… कुटुंब कबिल्याची काळजी वाटली होती…त्यांनीच सोन्याच्या फाळाच्या रूपाने पुण्याच्या भाळावर सोनेरी लकेर उठवण्यासाठी… मृत्यू ओढवून स्वतःचा संसार उठवलेल्या… लोहरदादांच्या पत्नी केशरबाई यांना “तुमचा मान वेगळा…तुम्ही आता आमच्या झालात”…असं म्हणत .. आपुलकीने त्यांची जबाबदारी स्वीकारली होती… हे सगळे शांतपणे पाहणारे शिवबा… त्यांच्या मनावर हा संस्कार बिंबवत होते..
झाम्बरेवाड्यात उपस्थित सगळ्यांचा आनंद डोळ्यांच्या कडांपर्यंत येऊन दाटला होता…”आजवर असं कौतुक कोणी केलं नव्हतं”..या भावनेने..


मात्र जिजाऊ त्यांना भावनिक न होऊ देता…”लोक सहभागाशिवाय मोठं कार्य घडत नाही…यापुढेही असाच सहभाग द्याल ना” अशी परिवर्तनाची हाक देत होत्या…शिवाय, “सोन्याच्या नांगराच्या फाळानी विजापूरच्या तटबंदीवर ओरखडे उमटणार” हे जिजाऊ जाणून होत्या…”आपण नागाच्या शेपटावर पाय दिलाय तो फुत्कारणारचं… आणि त्याचं हेच वर्षानुवर्षे असलेलं वारूळ आम्हाला खणून काढायचंय…आता माघार नाही”…असं जिजाऊ ठाम निश्चयाने म्हणतात..

परंतु त्यासाठी फक्त सोन्याची नांगरणी करून उपयोग नाही..तर जे बहरणाऱ्या पिकांसाठी कराव लागते ते पुण्यातील माणसांसाठी करायचं…आणि तरच गावगाडा सुरळीत होईल…असं जिजाऊ शिवबांना समजवताना सांगतात…पण हे मोठे आव्हान पिचलेल्या लोकांना बळ देऊनच पेलता येईल…त्यासाठी सोन्याच्या नांगराचा वृत्तांत कळवणारा आणि कर्नाटकातून पुण्याला मदत मागवणारा खलिता… महाराज साहेब यांच्याकडे पोहचला होता…

जिजा राणीसाहेबांच्या पराक्रमाने, त्यांचे महाराज साहेब भारावून तर गेलेच होते…त्याचबरोबर “तुम्ही घेतलेला गोरगरिबांचा कैवार हा शिमग्याचे सोंग ठरू नये …म्हणून आमची जबाबदारी आता वाढली आहे”…असे म्हणत मागितल्या मदतीपेक्षा जास्त मदत पाठवण्याचा निर्णय त्यांनी बेधडकपणे घेतला होता…

आदिलशहाच्या वजीर मुस्तफाखानने…शहाजीराजे यांची जिजाऊंना फूस असल्याखेरीज एवढं मोठं धाडस करणे शक्यच नाही…असे कान भरले होतेच आणि त्यात ही मदत पाठवणे म्हणजे संशय खरा करणे..असे म्हणत,आपली जहागिरी असली तरी विजापूर दरबारच्या.. परवानगीशिवाय मदत पाठवू नये असा सल्ला रणदुल्ला खान देतात…. मात्र “आमच्यावर शक करणे म्हणजे आमच्या तलवारीवर शक करण्यासारखं…आणि तो शक नाही केला तरच सार्थ ठरेल…अश्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी परवानगी मागणे…आम्हाला ना मंजूर”…असे म्हणून बेदरकरपणाची ठिणगी शहाजी राजे महाराज साहेबांच्या डोळ्यात फुलली होती…
तर दुसरीकडे पुण्यात निर्वानीरव झाली असली तरी मिया अमीन दुप्पट जोमाने पलटवार हा करणार म्हणजे करणारच …


आणि म्हणूनच त्याच्यावर जिव्हारी हल्ला चढवायच्या हेतूने.. बहरत्या पुण्याचे स्वरूप एक अंकुरित रोप पाठवून त्याला पुनश्च आव्हान देण्याचा…हा मार्ग जिजाऊंनी अवलंबला होता… कारण, हा आपला अंतिम विजय नाही…याची जिजाऊंना जाणीव होती”..


आता मिया अमीनच्या जिव्हारी लागलेला घाव तो कशाप्रकारे भरून काढेल…पुण्यातील परतलेल्या लोकांना त्याची काय किंमत मोजावी लागेल…हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…
लेखिका पूनम कुचेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here