जिजाऊंच्या संकल्पनेतून फिरवला सोन्याचा नांगर लेखमालिका भाग १३ : १८ सप्टेंबर २०२०

0
43

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, असंख्य अडचणींना पार करून…सोन्याचा नांगर तयार झाला होता…ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरला होता…त्या पुण्यात जिजाऊंच्या धाडसाला धुमारे फुटू लागले होते…ज्या मिया अमीनचे फक्त नाव ऐकून लोकं गलितगात्र होत होते…आज त्याच लोकांमध्ये जिजाऊंनी प्राण फुंकले होते…भलेही, पुण्यातील मातब्बर वतनदार मंडळी एक झाले नव्हते तरी, बारा मावळातील 16 अलुतेदार आणि 12 बलुतेदार जिजाऊंच्या हाकेने एकत्र आले होते…

पुण्याची झालेली वाताहत याच लोकांनी अनुभवली होती…दैवाची निष्ठुरता सहन करत दिवस ढकलणाऱ्या याच लोकांच्या मनात जिजाऊंनी विश्वासाचा हुंकार भरला होता…पुण्याला पूर्ववत वसवून त्याचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी…जिजाऊंनी हर प्रयत्न केला होता…पुण्याच्या वेशीवरील पहार उखडून एका असामान्य संघर्षाची सुरुवात केली होती…विघ्नहर्त्या कसबा गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली होती…लोकांची मानसिकता बदलणे हेच ध्येय जिजाऊंनी मानले होते…सोबतच, आदिलशहाच्या दहशतीचे आणि मिया आमीनच्या अहंकाराचे कंबरडे मोडले होते…


त्यातच महाराज साहेबांची विलक्षण साथ त्यांना मिळाली होती…दोघांमधल्या अंतराची आकडेमोड जिजाऊंनी कधी मांडलीच नव्हती…महाराज साहेबांनी सोपवलेली जबाबदारी.. पार पाडण्यासाठी जिजाऊंना आता तर जिवाचीही पर्वा राहिली नव्हती…सोन्याचा नांगर म्हणजे जिवावर बेतणारे संकट जरी असले तरी आता “गाफील राहू नये” त्यांनी असा जपमंत्रच जणू दिला होता… कारण, त्यांना आता माघार मान्य नव्हती…


मराठी मुलखाच्या पायाभरणी साठी पुण्याचा गावगाडा सुरळीत करून स्वराज्याच्या दिशेकडे वाटचाल सुरू होणार होती….सगळी सिद्धता झाली होती…नांगराला सोन्याचा साज चढला होता…जिजाऊंना शिवबांनी नांगर धरायला हवा होता…पुण्याची निषिद्ध भूमी शिवबांच्या हातून सोन्याच्या नांगराने नांगरून लोकांच्या मनात शिवबांचे नाव रुजवायचे होते…यानेच महाराज साहेबांचे “शिवबांना प्रजाहितदक्ष राजा बनवा” हे बोल खरे ठरणार होते…त्यासाठीच सर्वसमावेशक स्वाभिमानाचे प्रतीक असलेला सोन्याचा नांगर धरायला जिजाऊंनी शिवबांना पुढे केले होते…
मिया आमीनच्या भीतीने आजवर ज्या पुण्यात जिवासोबतच श्वासही मुठीत धरला जायचा, आज त्याच पुण्याच्या भूमीत जिजाऊंच्या आणि शिवबांच्या नावाचा जयजयकार दुमदुमत होता…


तर दुसरीकडे मिया अमीन त्याच्या उरल्या सुरल्या अहंकाराचा पाणउतारा करून घेण्यासाठीच… जणू देशमुख कुलकर्णी वतनदारांच्या उसन्या अवसनावर तिथे आला होता… लोकांना दटावत या मंगल कार्यात विघ्न बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या… मिया अमीनला कोणाकडूनही कसलीच दाद मिळाली नाही…उलट जिजाऊ कडाडल्या…”इथल्या कष्टकरी शेतकरी लोकांच्या भल्यासाठी आम्ही हा गुन्हा वारंवार करू” अस म्हणून लोकांना लोकांना विश्वास देत होत्या… निर्धाराला विझू देत नव्हत्या…मात्र तिथे जमलेल्या लोकांना त्यांच्यातल्याच जिवंतपणाची जाणीव केव्हाच झाली होती…एकतेची दुष्टचक्राला पाडणारी भिंत केव्हाच तयार झाली होती…कोणीही आपल्या निश्चयापासून ढळले… नव्हते घाबरले नव्हते…उलट “हा सोन्याचा नांगर आम्ही बनवलाय” असं छाती ठोकून सांगत होते…सगळ्यांच्या एकीने मिया अमीनचा उरला सुरला अहंकार दगडाने ठेचला गेला होता…आणि पुण्याचा अंमलदार म्हणवणाऱ्या… मिया अमीनला पळता भुई थोडी झाली
होती…हे सगळे शक्य झाले होते…जिजाऊंच्या संकल्पनेने, त्यांच्या जिद्दीने, सोन्याच्या नांगराने, त्यांनी दिलेल्या विश्वासाने आणि त्यांच्या अथक परिश्रमाने, प्रेरणेने…


शिवबांनी जिजाऊंच्या प्रेरणेने नांगर धरला…बैलजोडी गाढवाच्या नांगराच्या फारट्याचे नामोहरम करत पुढे चालली…पुण्याची भूमी पावन झाली…जणू स्वराज्य जगदंबेने पुण्याच्या भाळी भव भाग्यशाली भाग्यरेषा…शिवबांच्या हातून रेखली होती… आणि मराठी मुलखाचा भावी भाग्यविधाता घडवत होती…


आता जिजाऊंनी शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवून…अशुभाचे शुभ केले होते…परंतु मिया आमीनच्या शेपटावर पाय दिल्याने तो काय पाऊल उचलणार…हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here