जिजाऊंच्या संकल्पनेतून फिरवला जाणार सोन्याचा नांगर लेखमालिका भाग १२ : १७ सप्टेंबर २०२०

0
75

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या १७ सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, कुलकर्णी वतनदार.. सोन्याचा नांगर बनू नये, यासाठी केलेला बुद्धिभेदक प्रयत्न कितपत सफल झाला आहे हे पाहण्यासाठी… झाम्बरे पाटील वाड्याभोवती घुटमळत असलेला.. जिजाऊंच्या नजरेतून सुटला नव्हता…नांगराची कामं सोडून आलेले..मांग,लोहार, कुंभार,चांभार,सुतार या साऱ्यांच्या समक्ष जिजाऊ… कुलकर्णी वतनदाराला फैलावर घेतात…त्याच्या कुरघोडीला उत्तर देत…बुद्धिभेदाला च्छेद देतात…आणि पुण्याच्या वेशीतली आदिलशाही दहशत असलेली…नजरेआड न केलेली..शत्रूस्वरूप लोखंडी पहार वितळवून… त्याचाच फाळ बनवणार असा निर्णय घेतात…

नांगराच्या सरंजमाला घडवून..सोन्याच्या नांगराला बनवण्याचं काम पुन्हा सुरू करण्याचा निर्धार ही सारी मंडळी करतात…सुतारकाम,कुंभारकाम, चांभारकाम,रश्शी वळणे, आणि सगळ्यात महत्वाचे पहार वितळवून बनणाऱ्या अलौकिक फाळाचे काम पुन्हा सुरू होते… परंतु फाळाचे काम अडवून काही होत नाही…हे उमजून देशमुख वतनदार, काम वाढवून अडवणूक करू पाहत होते…
जिजाऊंनी सोपवलेली कामगिरी बजाविण्यासाठी कितीही मेहनत आणि त्रास सहन करण्याचा चंग लोहार दादांनी बांधला होता…शिवबा निगुतीने त्यांचे काम कष्ट पाहत होते…त्यांची होणारी दमछाक आणि तरी त्यांच्यात संचारलेली एक उर्मी..शिवबाच्या डोळ्यात तेज निर्माण करत होते…

मात्र, विस्तवाची भट्टी आणि मनातला विचार काही केल्या विझू देणार नाही…”रात्रभर जागुन फाळाचे काम पूर्ण करू”असा विश्वास लोहरदादा शिवबांना देतात…फाळाच्या कामाचा घेतलेला ध्यास…


हा आपल्या भाळावरील मृत्यूची लकेर ठळक करणारी असेल…आणि कारभारणीच्या भाळावरील कुंकवाची लकेर पूसणारी असेल याची जाणीव नसलेल्या लोहरदादांच्या जीवावर बेतलं होतं… फाळ तयार होऊ नये यासाठी जीव घेण्यापर्यत मजल मारून…मिया अमीनने आदिलशहाच्या शेवटच्या चेतावनी स्वरूप खलित्याला उत्तर दिले होते…पण, जिजाऊंच्या विचाराने चेतलेली लोहारीन मनातली पणती… या मृत्युच्या तांडवानंतरही साधी फुरफुरत देखील नव्हती…पतीच्या मृत्यूनंतर देखील त्याचा ध्यास पूर्ण करून…आदिलशाही पहार वितळवून… फाळ बनवण्याच्या अद्वितीय निर्धाराने…मनात चेतल्या ज्योतीला एक असामान्य संरक्षण दिले होते…


पतीच्या निधनाच्या दुःखाने हतबल न होता…”जोवर माझ्या धन्याचे सपान पुरं व्हायचं न्हाई, तोवर माझ्या कपाळीचं कुंकू पुसायचं नाही…आधी आगीत ती आदिलशाही पहार वितळल, त्याचा मी फाळ करील…तो तुमच्या हवाली करील..त्याच्याच साक्षीनं अन् मगच त्याला आगीनदान मिळंल..पयली त्याची भट्टी पेटंल मग त्याची चिता…माझा नवरा गेला पण तो लढाईत गेला असंच मी समजते…आजूनबी लोकं जात्याल पण तुमचं सापान पुरं व्हईल”…असं म्हनून फाळाचे काम पूर्ण करण्यासाठी पदर खोचून…

पतीच्या ध्यासाचं अन् श्वासाचं इंगळ तापवुन…कुंकू सांडून तयार केलेला फाळ जिजाऊंच्या हाती सुपूर्त करणाऱ्या…त्या केशर लोहरीनबाईच्या धैर्याचा जिजाऊंना हेवा वाटतो… सगळ्यांच्या निर्धाराला लोहारदादांच्या बलिदानामुळे एकहाती दहा हातांचे… बळ मिळाले होते…त्याचे फलस्वरुप म्हणून सोन्याचा नांगर तयार झाला होता…आणि एवढा वेळ, “आम्ही तुमच्या थोरल्या बहिणीप्रमाणे तुमच्या पाठीशी आहोत” असे त्यांचे सांत्वन करणाऱ्या जिजाऊंना… हा सोन्याचा नांगर आपल्याही जीवावर बेतू शकतो…याची जाणीव होऊन…एका तडफेने जिजाऊ पेटून उठल्या होत्या…


“पहारीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, आज लोहरदादा गेले…त्यात उद्या आपणही असू …प्राण गेला तरी बेहत्तर”, असे म्हणत… जिजाऊ शिवबांना सिध्द राहण्याचा इशारा देतात…
आता जिजाऊ अमंगलाचे मंगल कशाप्रकारे करणार…आणि मिया अमीनचे विघ्न दूर सारून सोन्याचा नांगर कसा धरणार हे पाहण्यासाठी…पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here