स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, गाढवाचा नांगर फिरवलेल्या बेरड पुण्याच्या भूमीत..आदिलशाही दहशतीच्या… ठिकऱ्या ठिकऱ्या करत…लोकांचे पुनर्वसन केलेल्या…तसेच,
लोकांच्या मनातली भीती समूळ नष्ट केलेल्या.. आणि त्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षा आपली लोकं महत्वाच्या मानणाऱ्या जिजाऊंना.. मात देण्यासाठी… मिया अमीन निष्पाप लोकांना त्रास देत होता…
आपल्या लोकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिजाऊंनी पुण्यातला झाम्बरेवाड्यातला मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला होता… आणि खेडबाऱ्यातल्या बापूजी मुदगल देशपांडे यांच्या वाड्यात जिजाऊंचे आगमन झाले होते… जवळच असलेल्या शिरवळ ठाण्यातील मिया अमीनला…जिजाऊंना मात देण्यासाठी ही आयती संधी वाटत होती परंतु त्याला आणि त्याच्या अहंकाराला जाळण्यासाठी जणू आग होऊन जिजाऊ त्याच्याच शिरवळच्या अंगणात आल्या होत्या…
शिवाय, बेरड पुण्यात प्रवेश करताना, जिजाऊंसोबतच्या असलेल्या शिवबांना…ज्या ठिकाणी उध्वस्त वाडे वस्त्या, मेलेल्या लोकांचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेली गिधाडे दिसली होती…
त्याच ठिकाणी… लोकांनी जिजाऊंच्या प्रेरणेने… सोन्याचा नांगर घडवला होता, त्यात विघ्न घालणाऱ्या मिया अमीनला पळवून लावलं होतं… सुरमा घातलेल्या डोळ्यासमोर एकीचे तेज इतके वाढवले होते…की त्यालाच नजर खाली करण्यासाठी भाग पाडले होते…
हा परिवर्तनाचा संघर्ष सुरू झाल्यापासून शिवबा घडत होते…परिवर्तनाच्या संस्कारांनी पोक्त होत होते…जिजाऊंच्या प्रेरणेने शिवसिंह आकार घेत होता…राजकारणाच्या दौडधुपीत शिवबांना कधी मिळाले नव्हते ते…मित्र..परंतु देशपांडे वाडयावर चिमणाजी बाळाजी हे नवे मित्र…मिळाले होते…
शिवबांना सोन्याचा नांगर धरायला लावून… लोकांच्या मनात शिवबांचे नाव बिंबवले होते…परंतु, स्वराज्य स्वप्न साकार करण्यासाठी.. जिजाऊ त्यांना बारामावळाची यथावश्यक अशी ओळख करून देत… “मावळ म्हणजे सूर्य मावळतीला जातो त्या दिशेकडील प्रांत फक्त एवढेच नसून…बारा मावळ ही संकल्पना बारा महाबलय मिळून तयार झाले आहे..”अशी आपल्या जहागिरीचे आकलन करून देत असतानाच… जिजाऊंना थेट आव्हान देण्यासाठी अमीन तिथे येतो…
“जहागिरीचा मुलुख समजावून सांगताना जहागिरीची हद्द सुध्दा माहीत करून घ्या…आणि हद्दीतच रहा…जर हद्द ओलांडली तर पुन्हा पुण्यातून गाढवाचा नांगर फिरवू…” असे म्हणता क्षणी नजर रोखून…निडर शिवबा मिया आमीनवर धावून गेले… मिया अमीनने उगारलेल्या तलवारीचे भानही शिवबांना त्यावेळी उरले नव्हते…जणू शिवसुर्याच्या तेजपुंज नजरेने मिया आमीनच्या त्या विधानाला ललकारले होते…की, ही हद्द तर सोड..आम्ही अटकेपार झेंडा रोवू…
परंतु, शिवबांवर तलवार रोखल्याने बंगळुरूला शहाजीराज्यांच्या दालनात एक लाव्हा उसळला होता…
मिया अमीनला आदिलशहाचा वजीर मुस्तफाखानाची फूस असल्याने… तो हे पांगळ धाडस करतोय म्हणूनच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी… बुद्धिबळाच्या जोरावर..विजापूरच्या वजीराला पटावरून बाद करण्याचा निश्चय बुद्धीमानी महाराज साहेबांनी केला होता… तर दुसरीकडे, स्वतःची दहशत म्हणजे अबलक घोडा मानणाऱ्या मिया अमीनला शिवबांनी रोखलेली नजर स्वस्थ बसू देत नव्हती…तो पुरता हादरला होता…लोकपारख समज असल्याने त्याने शिवबांना जोखले होते…
“पोरवयातील शिवबा आता डोळ्याने आग ओकतोय…पुढे जाऊन हाच आपल्या सल्तनतीला खूप मोठा धोका बनेल”…अशी भीती त्याला वाटत होती… त्यामुळे शिवबांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता… अन् दुसरीकडे शिवबांच्या पराक्रमाने खुश होऊन …महाराज साहेबांनी शिवबांसाठी भोसलाई लेणं… कवड्यांची माळ भेट स्वरूप पाठवली…परंतु शिवबा ती धारण करण्यासाठी सक्षम आहेत की नाही…यासाठी कसोटीस उतरावे लागणार होते…कसोटी शिवबांची असली तरी कस जिजाऊंच्या संस्कारांचा लागणार होता…
आता भोसलाई लेणं कवड्यांची माळ धारण करण्यासाठी शिवबांना कोणत्या कसोटीस उतरावे लागणार आणि सोबतच मिया आमीनच्या थेट आव्हानाला जिजाऊंचं काय असेल प्रत्युत्तर …हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…
लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.