जिजाऊंचा वज्रसारखा धीर काही केल्या तुटत नाही हे ऐकून जिजाऊंच्या जीवितास हानी पोहचवण्यासाठी मिया आमीनचा नवीन डाव लेखमालीका भाग १६ : २२ सप्टेंबर २०२०

0
44

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 22 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, मिया आमीनच्या हैदोसामुळे हैराण झालेले लोक…जिजाऊंच्या कडे गाऱ्हाणं घालण्यासाठी आलेले असतानाच त्यांच्यात वेष बदलून आलेला फकरुद्दीन खान हा जिजाऊंनी लोकांचा वारंवार सांधलेला विश्वास मोडून…मिया अमीनचे इप्सित साधत होता…महाराज साहेबांनी पाठवलेली मदत लुटली गेली या खबरेने तर लोकं पाठ फिरवू लागली…जणू त्यांच्या मनातील भीतीचा ब्रह्मराक्षस पुन्हा जागा होऊ पाहत होता… जाणाऱ्या लोकांना पाहून…जणू जिजाऊंनी लोकहितासाठी घेतलेली मेहनत, केलेले धाडस, दिलेली प्रेरणा, दाखवलेले ध्येर्य सगळं सगळं मातीमोल ठरून हातून निसटून जात होतं…

मात्र तरी देखील जिजाऊंनी कच खाल्ली नाही…उलट, “मिया अमीन दिवसा ढवळ्या येऊन सुरमा घातलेले डोळे वटारायचा…पण आता तो लपून छपून रात्री येऊन कुरघोडी करतोय…त्याच धाडस तुम्ही पांगळ केलंत, त्याची दहशत तुम्ही लंगडी केलीत, त्याला पुण्याच्या माळावरून तुम्ही पळवून लावलेत…तुमची ताकद हिंमत त्याने जोखली आहे म्हणूनच तो अशी भ्याडकृत्ये करतोय.”..असं म्हणून त्यांनीच केलेल्या दिव्याची कल्पना देत…


जिजाऊ त्यांचा धीर पुन्हा सांधतात… तुम्हाला माणसासारखे जगायला मिळेल, माणूस पण मिळेल अशी हमीही जिजाऊ देतात…त्यासाठी आपल्या खाजगीतील मौल्यवान वस्तू आणि स्त्री धन गमवायला ही मागेपुढे पाहत नाहीत…”रयतेचे सुख हाच आमचा दागिना..आणि महाराज साहेबांनी केलेलं कौतुक आमच्यासाठी अधिक मौल्यवान…”असं म्हणत महाराज साहेबांच्या मदतीशिवाय गावगाडा सुरळीत करण्याचे आश्वासन लोकांना देतात…तर दुसरीकडे महाराज साहेब पाठवलेली मदत चोरीला गेल्यामुळे अस्वस्थ असतात आणि ह्यामागे आदिलशहाचा वजीर मुस्तफाखान याचा हात असल्याचा अंदाज रणदुल्ला खान यांच्याकडे व्यक्त करतात…परंतु “आता डाव प्रतिडाव सुरू झालेत…आम्ही मदतीचा दुसरा मार्ग मोकळा करू.. पण,आम्ही राणीसाहेबांचा धीर खचू देणार नाही…”असा निर्णय घेतात…


तर, झाम्बरे पाटील वाड्यावरचा वृत्तांत कळल्याने मिया अमीन पुरता बेजार झाला होता…शिवाय, जिजाऊंच्या मागणी प्रमाणे…लोकांना भरपाई स्वरूप दिली जाणारी मदत पोहचली होती..धान्य, गुरं सगळं सगळं अगदी बेजवार आलं होतं..


पण,मिया अमीनला अपेक्षित अस काहीच घडत नव्हतं..
जिजाऊंचा वज्रसारखा धीर काही केल्या तुटत नाही हे ऐकून जिजाऊंच्या जीवितास हानी पोहचवण्यासाठी मिया आमीनने नवीन डाव आखला होता…


आता जिजाऊ ह्या नवीन संकटाला कसे सामोरे जाणार…हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here