आता हा सोन्याचा नांगर गाढवाच्या नांगराचे फराटे कसे पुसून काढणार..आपल्या माणसाच्या मनातले अविश्वासाचे ढेकळ कसे फोडणार… लेखमालिका भाग ११ : १६ सप्टेंबर २०२०

0
51

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
जिजाऊंनी स्वराज्याच्या पायाभरणीसाठी आखलेले लोक सहभागाचे धोरण एव्हाना सगळ्यांना कळले होते…पण तसे का हे कोणालाही उमगत नव्हते…झाम्बरे पाटील पाटलीनबाई, गोमाजी बाबा, सोनोपंत, बाजी काका आणि शिवबांना समजावताना जिजाऊ म्हणाल्या…”पुण्याच्या पंढरीत गाढवाचा नांगर चालवला… काळ्या आईत, शेत शिवारात नांगर बंद पडला…वाळवी लागली तर कित्येक नांगर कुजून गेले…त्यामुळेच मूळ पुण्यातील अलुतेदार, बलुतेदार, कुणबी, ब्राम्हण, मराठा सर्व विखुरले…त्या एका नांगरामुळे दुःख, दैन्य, उदासी,उपासमार त्यांच्या नशिबाला आली… आणि म्हणूनच…या यातना ज्यांच्या नशिबी आल्या त्यांनी हा नांगर तयार करावा…

या नांगराला सगळ्यांचा हातभार लागावा…असा जर नांगर तयार झाला आणि त्याने केलेली मशागत झाली ना… तर शेतातील येणारी कणसे मोत्याने लगडतील”… जिजाऊंच्या धोरणाने एकीचे रूप धारण केले होते…परंतु मिया अमीन गप्प बसून राहणाऱ्यातला नाही हे देखील तितकेच खरे होते…


शिवबांच्या या अर्थपूर्ण उक्तीस खोडुन काढण्यासाठी…एकी हीच दुष्टचक्राला पाडणारी भिंत आहे…असे म्हणत… कसलासा निश्चय करत…शिवबांना एक मशाल विझवायला सांगतात…शिवबादेखील झटक्यात ती मशाल विझवतात… परंतु, मशालीपेक्षा कित्येक पटीने लहान असलेल्या पणत्या विझवणे..शिवबांसाठी अशक्य बाब होते…कारण एकदा विझवलेली पणती दुसऱ्या पणतीने पुन्हा पुन्हा पेटत होती…

जिजाऊ या साऱ्यातून एक संस्कार घडवत होत्या…एकी आणि बांधिलकीमुळे विझल्या पणत्या पुन्हा पेटत होत्या…आपण कोणाला विझू द्यायचं नाही…असे समजवताना जिजाऊ भावी निश्चयाचा महामेरू…निश्चयाने घडवत होत्या…समूह शक्ती हीच खरी शक्ती या शक्तीची ओळख करून देत होत्या…”सोन्याच्या नांगराने हीच समूह शक्ती जागी होणार…सोन्याचा नांगर हे फक्त निमित्तमात्र पण आमचा मुख्य हेतू आहे गावगाडा सुरळीत चालू करणे”…असं जिजाऊ म्हणतात… तर दुसरीकडे, मिया अमीनचे इप्सित साध्य करण्यासाठी देशमुख कुलकर्णी साम दाम दंड वापरून…जिजाऊंना अप्रत्यक्ष आव्हान देत होते….


जिजाऊंच्या धाडसाला लोक प्रतिसाद देऊ लागली होती… तर काही जण पुण्यात रहायला आलेही होते…त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये…यासाठी देशमुख कुलकर्णी जीवावर उदार होऊन झटत होते… जिजाऊंच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या नांगरासाठी सरंजाम बनवणाऱ्या निष्ठावान लोकांचे इमान…दाम देऊन विकत घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर…त्यांनी बुद्धिभेद हा मार्ग अवलंबला होता…आणि पुण्याची निषिद्ध भूमी निर्वंश तरी करेल… नाहीतर मिया अमीनची गैरमर्जी होईल…असा समज पुन्हा पसरवला गेला होता… त्यामुळे आजपासून पाचव्या दिवशी आम्ही नांगर हाती धरणार…असा निर्धार केलेल्या जिजाऊ… हे शांतपणे ऐकून घेत असतानाच… या साऱ्याचा बोलवता धनी आणि मिया आमीनच्या मर्जीतला मनी…जिजाऊंच्या नजरेस पडतो…


आता आदिलशहाच्या उखडलेल्या पहार स्वरूप दहशतीला वितळवून… त्याचा नांगर बनवून…जिजाऊ पुण्याच्या पडीक भूमी आणि भाकडकथांना कसे नांगरून काढणार हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता… फक्त सोनी मराठीवर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here