स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 29 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
आदिलशहाच्या खालीत्यामुळे मिया आमीन सुखावला होता…त्याच्यासाठी तो खलिता म्हणजे…त्याचे बांधलेले हात मुक्त करणारा दूतच होता…”जोवर खेडबऱ्यात येऊन राहिलेल्या जिजाऊ कोणत्याही प्रकारे बंड किंवा आदिलशाहीच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत तोवरच त्यांचा आणि शिवबांच्या जीवाचा मुलाहिजा ठेवा…अन्यथा, कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाई करण्यात यावी”…असे फर्मानच मिया अमीनला मिळाले होते…
शिवबांवर त्याचा विशेष डोळा होता…कारण नखाएव्हढं पोर..पण त्याला न जुमानता निडरतेने अंगावर धावून आल्याचा राग अनावर झाला होता… त्यामुळेच शिवबांना दगाफटका करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती…मिया आमीनच्या तुकड्यांवर जगणाऱ्या कुलकर्णी वतनदाराला शिवबांच्या पाळतीवर राहण्याचे काम सोपवले होते…परंतु शिवबा सवंगड्यांमध्ये खेळताना दिसत नव्हते…शिवबांचा वेगळाच खेळ सुरू झाला होता… दिवसभर तहानभूक विसरून…शेतकरी बाबांची मदत करत…उन्हांत राबलेल्या शिवबांच्या…पायाला फोड आल्याने ते झोपेत ग्लानीतच वेदनेने विव्हळत होते…
शिवबांशी कसोटीकाळात न बोलण्याचा पण केलेल्या…आउपन कठोरपणे बाजूला सारून जिजाऊ… शिवबांशी एकही शब्द न बोलता…शिवबांच्या पायाला हळद लावून त्यावर मायेची मूक फुंकर घालून…शिवबा ही कसोटी पार पडतील अशी… “आशा” घेऊन निघून गेल्या होत्या…
मात्र, कसोटीचा दुसरा दिवस उजाडला होता… आशा, विश्वास, आशीर्वाद, निष्ठा आणि लोकमान्यता सादर करण्याचे आव्हान शिवबांनी हिमतीने स्वीकारले होतेच…परंतु, शेतकरी बाबांनी दिलेला गळ्यातील ताईत गहाळ झाला होता…सर्वत्र शोधूनही न सापडणारा ताईत..वेळेचा अपव्यय ठरत होता…तर दुसरीकडे शिवबांची तगमग पाहून… बाजी काकांच्या काळजाचा पीळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता…तूर्तास शिवबांना जाणतं होऊद्या..कवड्यांची माळ घालतीलच मागाहून…सोनोपंतांसमोर असा निर्वाणीचा उद्गार देखील काढला होता…शिवाय, लेकराने काल काय दिव्य केले ते तरी विचारा..कौतुक तरी करा…असं अधिकारवाणीने सांगितले… परंतु, हे सगळं ऐकणाऱ्या शिवबांना “जगरहाटीप्रमाणे कौतुक हे यशाचे होते…परिश्रमाचे नाही”…जिजाऊंनी अश्या खोचक शब्दांनी…कसोटीचे गांभीर्य लक्षात आणून दिले…
कौतुकासाठी आसुसलेल्या शिवबांना…त्या कसोटीचे महत्व पटले होते…कवड्याच्या माळेच्या लौकिक शिवबांच्या ध्यानी आला होता…आणि कवड्यांच्या माळेसमोर नतमस्तक होताना…”कवड्यांची माळ तू, भोसले कुळीचं लेणं तू,भोसले कुळीचा खरा दागिना तू,चौसष्ट कवड्याची माळ तू,आई जगदंबेचे वाण तू,तुझा फेरा गळ्याभोवती असला तर…मन कुठल्याही फेऱ्यात अडकत नाही असे म्हणतात…वाढवडिलांचा तसा बोल आहे…आमच्या कुळीच्या पराक्रमाची तू दस्तानही आहेस…म्हणून आमचे चित्त तुझ्यात एकवटलेले आहे…त्याला धारण करण्यासाठी आम्ही, ही सत्वपरिक्षा देऊन…स्वतःला सिद्ध करूच…आणि तुला परिधान ही करू…त्यासाठी दऱ्या खोऱ्यांची, उनवाऱ्याची कसली, कसली…पर्वा करणार नाही…पायाला कितीही फोड येऊदे… कितीही काटे टोचू दे…पण आता माघार नाही…”असा निर्धार करतात… मात्र, बाजी काकांकर्वी “माळेशी बोलून कार्यभाग साधणार नाही…दिवस वर आला तरी,असे रेंगाळणे बरे नाही…आशा, विश्वास, आशीर्वाद, निष्ठा लोकमान्यता या गोष्टी मावळात मिळणार आहे…अश्या कठोर शब्दातच…निरोप घ्यायला भाग पाडतात…
आणि तेवढ्यात, “आशा” याठिकाणी ठेवलेला शेतकरी बाबांचा ताईत शिवबांचे लक्ष वेधून घेतो…
शिवबांना त्या ताईताच्या रूपाने…शेतकरी बाबांनी दिलेली जगण्याची आस म्हणजेच… मिळालेली “आशा” गवसली होती…आणि क्षणात सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला…गळ्यातील हरवलेला ताईत इथे आहे म्हणजे…आऊ रात्री दालनात आल्या होत्या पायाला हळद लावली त्यामुळेच वेदना शमली…आपले पाय दुखत नाहीत ते आऊ साहेबांच्यामुळे, आम्हाला वेदनारहित झोप मिळावी म्हणून…त्यांनी जागरण केलं…आऊ बोलल्या नाहीत, पण त्यांच्या स्पर्शातून त्यांची माया शिवबांना समजली… आणि एक नवा उत्साह शिवबांच्या अंगभर सळसळला…आणि “उरलेल्या गोष्टीही नक्कीच मिळणार” असा “विश्वास” देऊन रोहिडे खोऱ्याकडे बाजी काकांसोबत मार्गस्थ झाले…
आता शिवबांच्या पाळतीवर असलेल्या मिया अमीनला…त्यांचा थांग लागेल का… आणि शत्रू पाठीवर बांधून.. शिवबा ही सत्वपरिक्षा कशी पार पाडणार… हे पाहण्यासाठी…पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…
लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.