छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा :
गनिमी कावा म्हणजे :-
जे दिसत तसं नसतं,
जे बोलायचं दाखवायचं ते करायचं नाही आणि करायचं ते बोलायचं नाही..
( शत्रूला गाफील ठेवण्यासाठी वापरली जाणारी युद्धनीती )


शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते . आदिलशाही , कुतुबशाही , निजामशाही , डच इंग्रज , फ्रँच , इत्यादी . शत्रूजवळ अफाट फौजा होत्या, शेकडो तोफा होत्या, भरपूर दारूगोळा होता, पण शिवरायांचे सैन्य मात्र खूप थोडे होते. महाराजांचे ते थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्यासोबत कसे लढणार? खुल्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार ?
तेव्हा शिवरायांनी विचार केला , की महाराष्ट्र हा डोंगरदर्या मुलूख आहे . इथं डोंगर, घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे . या सगळ्याचा विचार लक्षात घेऊन महाराजांनी शत्रूशी सामना कसा द्यावा हे ठरवले होते .


शत्रूच्या घोडेस्वारांजवळ खोऊ सामान असे . सैन्य ते आवरून मग लढाईला निघायला त्यांना खूप वेळ लागे. पण याउलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसायचे . पाठीला ढाल असायची , आणि कमरेला तलवार , सोबत हातात भाला एवढेच त्यांचे सामान होते . मावळे पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत . महाराजांचे मावळे खूप चपळ व काटक होते . महाराजांनी या साऱ्या गोष्टींचा विचार करून शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले होते , यात महाराजांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येत आहे .


बहिर्जी नाईक यांच्याकडून शत्रूच्या गोटात गुपचूप आपली माणसे पाठवून महाराज शत्रुपक्षाची खडान खडा माहिती मिळवायचे . शत्रूवर अचानक हल्ला देखील करायचे . शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच मावळे वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत.


डोंगराळ भागात अशा लपूनछपून लढाया करायला महाराजांनी सुरुवात केली होती . यालाच ‘गनिमी कावा’ असं म्हणतात.
शिवरायांनी गनिमी काव्यामुळे बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला होता .