विघ्नहर्ता गणरायाची प्राणप्रतिष्ठापना .. लेखमालिका भाग ७ :११ सप्टेंबर २०२०

0
31

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
ठकार शास्त्रींच्या वाड्यात कसबा गणपतीची प्राण प्रतिष्ठा मुहूर्तावरच पार पाडून मिया अमीनच्या चेतावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी… जिजाऊ तळपुन उठल्या होत्या… बुद्धीच्या दैवताला बुद्धीनेच स्थापित करावे लागणार होते…त्यासाठी राजवस्त्र त्यागून जिजाऊ आणि शिवबा गावकरी वेशात… मिया अमीनला चकवा देत…ठकार शास्त्रींच्या वाड्याकडे निघाले होते…

पण, झाम्बरे वाड्यातच जिजाऊंची अडवणूक करण्यासाठी आलेला मिया अमीन जिजाऊंकडून पुन्हा एकदा मात खाल्ल्याने तो पुरता चवताळून उठला होता…झाम्बरे पाटीलांना त्याचा रोष पत्करावा लागलाच…शिवाय, बुद्धीमानी जिजाऊंमुळे ढासळलेला अहंकाराचा मनोरा… त्याच्या खुनशी फतव्याने सांधायचा तो प्रयत्न करत… “कोणीही मंदिरात गेले,साधी घंटी जरी वाजवली, किंवा देवधर्म विधी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला महागात पडेल…असा आदेश दिला…यामुळे जिजाऊंच्या निर्धाराला त्या फतव्याची झळ बसली होती…


सर्वांना एकत्र घेऊन, कोणाचाही मान अवमान न करता, एकसंघ होऊन वाजत गाजत…कसबा गणपतीची प्राण प्रतिष्ठा करणं अशक्यच झाले होते…मिया आमीनच्या आदेशानुसार भीतीपोटी कोणीही बाहेर पडले नव्हते…जिजाऊ आणि शिवबांना देखील हशमांच्या नजरा चुकवून मार्ग काढावा लागत होता… तर दुसरीकडे, शास्त्रींच्या वाड्यात गोमाजी बाबा , आणि बाजी काकाच नव्हे तर विघ्नहर्तासुद्धा त्यांची प्रतीक्षा करत होता…काहीही झालं तरी, जिजाऊंच्या हातून त्यालाही पुन्हा मूळ ठिकाणी विराजमान व्हायचंच होतं… पण त्याच वेळी, बंगळुरूवरून जिजाऊंना सावध करण्यासाठी शहाजीराज्यांनी पाठवलेला खलिता.. मिया आमीनच्या हाती पडतो…

आणि जिजाऊंच्या शोधात असलेल्या अमीनला शास्त्रीवाड्याचा ठाव कळतो…मिया अमीनला आपला ठाव ठिकाणा कळला आहे हे माहीत नसलेल्या जिजाऊंनी बोलल्या शब्दाला जागून… मुहूर्त गाठून कसबा गणपतीची विधिवत प्राण प्रतिष्ठा केली…परंतु, बेसावध जिजाऊंना झाम्बरे पाटील मिया आमीन येत असल्याची खबर देऊन सावध करतात..


तो पर्यंत शत्रू दाराशी आला होता…दाराबाहेरचं अमानुष विघ्न दार उघडून..आत असलेल्या विघ्नहर्त्याच्या मंगल रूपाचे, आणि जिजाऊंचे… अमंगल करण्याच्या उद्देशाने…मोठेच धाडस करू पाहत होते…तर, जिजाऊंनी मुहूर्त गाठला होता…गणेशाच्या प्राण प्रतिष्ठेचा आणि मिया आमीनच्या अप्रतिष्ठेचा…


आता जिजाऊ मिया अमीनला सामोरं जाऊन विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने…मिया अमीनची अप्रतिष्ठा कशाप्रकारे करणार…हे पाहण्यासाठी पहात रहा… स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर

  • लेखिका पूनम कुचेकर, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here