विघ्नहर्ता गणरायाची प्रतिष्ठापणा होणार का ..? जाणून घ्या .. लेखमालिक ५ : ९ सप्टेंबर २०२०

0
10

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 9 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
पुण्याच्या वेशीवरील आदिलशाही दहशतीची पहार उखडून फेकल्यानंतर… मिया अमीनने दोन पहारेकऱ्यांचा शिरच्छेद करून चेतावणी स्वरूप… ते शीर जिजाऊंना नजराणे म्हणून पाठवून व्यक्त केलेला राग… जिजाऊंना स्वस्थ बसू देत नव्हता…

मिया आमीनच्या चेतावणीची धास्ती त्यांना नव्हतीच…त्यांना कळवळा होता त्या पहारेकऱ्यांच्या कुटुंबाचा…कारण हे तेच मावळातले पहारेकरी होते ज्यांनी जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांच्या ठिणगीने मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती… मराठी मुलखाच्या विचारांनी त्यांना प्रेरित केले होते…भले ते आदिलशाहाच्या पदरी होते,पण त्यांना जिजाऊ विचार पटले होते आणि जिजाऊंच्या पायाशी शस्त्र ठेवले होते…प्रतिकार न करता…

परंतु, अस्वस्थ जिजाऊंना त्या पहारेकऱ्यांच्या कुटुंबाचा इतका कळवळा का हे शिवबांना उमगत नव्हते…त्यांना समजावून सांगताना जिजाऊ म्हणतात…”शिवबा, मराठी मनगटात अफाट मर्दुमकी आहे…पण आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची ससेहोलपट होणार नाही असा विश्वास जर त्यांच्या मनात निर्माण झाला तर, आणि तरच हे मराठी मनगट आभाळाला गवसणी घालील.”.. शिवबांना एक गुरुमंत्र मिळाला होता…पण या साऱ्या विचारात… कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेविषयी प्रश्न निर्माण झाले होते…जिजाऊंच्या बंडाला दिलेली मिया अमीनची चेतावणी…मावळमूलखात घबराटीचा वारा पसरवत…विश्वासाची ज्योत विझेल की काय अशी परिस्थिती पुन्हा उदभवली होती…”उद्याच प्रतिष्ठापना करू” हा विचार माघारी घ्यावा लागेल असे चिन्ह दिसत होते…

आणि दुसरीकडे पुण्यात जिजाऊंच्या विजयी वार्तेने हर्षोउल्हसित झालेल्या महाराज साहेबांच्या नावे आलेलं आदिलशाही दरबारी हजर होण्याचं फर्मान…आनंदावर विरजण टाकते…स्वराज्याचा मांडलेला पट सावरण्यासाठी जिजाऊ आणि शिवबांना पुण्यात ठेवणे हा त्यांचा त्याग खरंतर दूरदृष्टी होती… आदिलशाही चाकरी हा दिखावा होता…चार ठिपक्यांनी तयार झालेला स्वराज्याचा चौक त्यांनी कधीचाच संकल्पलेला होता…भगवी पताक्याची प्रतिमा मनात कधीच तयार केली होती…संभाजीराजेंना समजवताना.. स्वराज्याचा चौकोनी चौक होवो ना होवो पण स्वराज्याची त्रिकोणी पताका ही तयार व्हायलाच हवी…

असे शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता, असलेले शहाजीराजे महाराज साहेब ठिपक्याचे स्वतःचे स्वरूप स्वराज्यासाठी गाळायलाही तयार होते…बंगळूरू आणि पुणे अंतर जरी मोठे असले तरी जिजाऊंच्या मनीही तेच प्रतिबिंब होते…शिवबांनी ते पाहून “आबासाहेबांचे स्वराज्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू” असे वचन देऊन जिजाऊंच्या मनाला हुरूप देत विघ्नहर्ता कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी…आणि लोकांमध्ये विश्वासाचा दुसरा हुंकार भरण्यासाठी बळ देत त्यांच्या मनावरील भार कमी केला होता…तर इकडे आदिलशहाच्या समोर हजर झालेल्या शहाजीराज्यांनाच फर्जंदाच्या अधिकाराने कडाडताना पाहून…आदिलशाहा मिया आमीनवर गैरमर्जी झाल्याचे स्वरूप साडी चोळीचा नजराणा पाठवतो… मीया अमीन कसबा गणपतीची प्रतिष्ठापना कोणत्याच किमतीवर होऊ देणार नाही…या साठी काहीही करू असा आक्रोश करतो…

आता जिजाऊंच्या आडचणींमध्ये आणखी कोणती वाढ होईल…आणि कसबा गणपतीची प्राण प्रतिष्ठापना होणार का… हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर

  • लेखिका पूनम कुचेकर , मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here