लेखमालिका भाग ३ : ७ सप्टेंबर २०२०

0
240

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 7 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, जिजाऊंच्या निर्धारी दवंडीचा आवाज आणि त्यावर मिया आमीनच्या हरकतीचा फतवा…विजापुरात असलेल्या शहाजीराजे महाराज साहेबांच्या दालनापर्यंत पोहचतो… सोनोपंत डबीर आणि शहाजीराजांना मिया आमीनच्या उलट्या काळजाच्या वृत्तीचा थांग लागत नसतो…आदिलशहाच्या मर्जीत येण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि शिवाय जिजाऊ माघारी फिरणाऱ्या नाहीत…असा दृढविश्वासही एकाच वेळी शहाजीराजे यांच्या मनाला भेडसावत असतो…शिवाय, पुण्याच्या वेशीवर या सगळ्या परिस्थितीत “ज्या चकमकीच्या ठिणग्या उडतील… त्या ठिणग्यांवर उभ्या मराठी मूलखाचे भवितव्य अवलंबून आहे…आता परिवर्तनाच्या मशाली पेटतील की शत्रूच्या रागाचा आगडोंब उसळेल …हे आई भवानीलाच ठाऊक…अशा विचाराने मन घायाळही झाले होते…

तर दुसरीकडे जिजाऊ उद्याच्या भाग्याच्या सूर्योदयाची वाट पाहत…आणि मिया आमीनच्या फतव्याचा विचार करत…निद्रिस्त शिवबांकडे मायाभरल्या डोळ्यांनी पाहत असतानाच…झाम्बरे पाटीलांची घरधणीन फुलाबाई तिथे येण्याचं धाडस करतात…
शिवबांच्या काळजीच्या सोबतच धन्याची काळजी ही बोलून दाखवतात…मिया आमीनच्या जुलमी परिचयाचे दाखले पुढे करत…निर्धार मागे घ्यायला विनवणी करतात…पण जिजाऊंच्या ठाम निर्धारापुढे सगळं न्यून ठरतं… जिजाऊ म्हणतात…”मुलापेक्षा मुलुख महत्वाचा आहे आम्हाला…आणि तो ही आमच्या मुलासारखाच आहे…बोलायला आणि प्रत्यक्षातही… तेच आहे…आम्हाला हा मुलुख नांदता करायचाय… आणि अखेर काळाला कलाटणी देणारा सूर्योदय झाला…जणू आभाळीचे सूर्य नारायण…पुण्याचा भाग्योदय पाहण्यासाठी डोकं वरून काढून उभे होते… जिजाऊंच्या निर्धाराचे पाणी पाजत तलवारी परजल्या जात होत्या…बारा मावळात… माणसात उत्साहाचे वारे वाहत होते… इतक्यात, झाम्बरे पाटीलांना पातळेश्वराच्या पूजेदरम्यान बेसावध पकडल्याच्या बातमीने मिया आमीनची खेळी… जिजाऊंच्या लक्षात येते…आणि ते पुढचा मागचा विचार न करता… शिवबांना सोबत घेऊन…मिया आमीनच्या नाकावर टिच्चून पहार काढण्यासाठी वेशिकडे निघतात…बाजी काका आणि गोमाजी बाबा हे जिजाऊंच्या पाठीशी खंबीर आणि समोरचा वार अडवण्यासाठी गंभीर असा पवित्रा घेऊनच वेशीवर दाखल होतात…

तर दुसरीकडे आदिलशाही जुलमातून वाचण्यासाठी…जीव मुठीत धरून जगण्यापेक्षा आणि जीवानिशी मरण्यापेक्षा आदिलशाही चोगा घालून मेलेल्या मनाची समजूत काढत…मावळातलेच असूनही मिया आमीनच्या हुकुमावरून दोन हशम पुण्याच्या वेशीवर… पहारीकडे राखणीला उभे असतात…पण जिजाऊंच्या स्फुर्तीमय बोलांनी त्यांच्या मनात स्वाभिमान जागा होतो…मिया आमीनच्या दोन तलवारी जिजाऊंच्या पायावर लोळणं घेतात…पहार काढण्यासाठी प्रेरित करत जिजाऊ शिवबांना पुढे होऊन पहार काढायला सांगतात… तेवढ्यात,.मानेला तलवार लावलेल्या अवस्थेत झाम्बरे पाटीलांना घेऊन आदिलशाहाच वजीर मुस्तफाखान आणि त्याचे चार दोन हशम पुण्याच्या वेशीवर येतात..
आता जिजाऊंच्या धाडसी बाण्याचा उद्रेक कशाप्रकारे होतो…आणि शांतपणे सगळं बघणाऱ्या… शिवबांची तलवारीची घट्ट झालेली पकड कसा इतिहास घडवणार…हे पाहण्यासाठी…पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर

  • लेखिका पूनम कुचेकर ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here