राजे शहाजींची संकल्पपूर्ती करण्या .. जिजाऊ बनणार मराठी मूलखाची प्रेरणा भाग १० : १५ सप्टेंबर २०२०

0
40

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या १५ सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, मिया आमीनच्या बाजूने कौल देत…वतनदार देशमुख कुलकर्णी यांनी… स्वराज्य बांधणीच्या पायाभरणीसाठी… अथक प्रयत्नांनंतर जिजाऊंनी भरवलेली गोतसभा उधळून लावली होती…केवळ, “गाढवाचा नांगर फिरवला गेल्याने…पुण्याची भूमी ही निषिद्ध भूमी आहे…इथे रहायला आल्यास सगळ्यांचा निर्वंश होईल” असा अविश्वास पसरवून…


परंतु जिजाऊंनी यावरही “सोन्याचा नांगर” हा उतारा शोधून काढला होता… “जर गाढवाचा नांगर फिरवल्याने जमीन निषिद्ध होते…तर बघूच, सोन्याचा नांगर फिरवून जमीन कशी पवित्र होत नाही” असे म्हणून जिजाऊंनी गावात दवंडी द्यायला सांगितली… बारा मावळात पुन्हा एक उर्जा उत्साह बनून वावरत होती… शिवबांनी तर नांगरणी करण्यासाठी नांगर ही आणला होता…परंतु,”या लाकडी नांगराला सोन्याने मढवण्या इतका दाम आणि सोनही नाही आमच्याकडे त्यामुळे सोन्याच्या नांगराखेरीज आमच्या इच्छेला अर्थ नाही.” जिजाऊंच्या अश्या बोलण्याने शिवबा नाराज तर झालेच होते पण त्याहीपेक्षा भांबावून गेले होते…


आणि म्हणूनच, त्यांना मतीत अर्थापेक्षा गर्भित अर्थ शिकवण्याच्या हेतू घातलेले कोडे सोडवताना…जिजाऊ म्हणाल्या…”आम्ही सोन्याचा नांगर म्हणालो…सोन्याची तर जेजुरी पण असते…एक तीळ सात जण खातात…पण ते खरंच शक्य आहे का…शब्द वेगळा आणि त्यामागचा अर्थ वेगळा…” यावरून जिजाऊ सोन्याच्या फाळाबद्दल बोलतायत हा गर्भितार्थ शिवबांच्या तल्लख बुद्धिने ओळखला होता…कारण, फाळाशिवाय नांगर नाही… जिजाऊंची हीच शिकवण शिवबांना…पुढे जाऊन फार मोठी कोडी सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार होती…

तर दुसरीकडे, जिजाऊ पुण्याची निषिद्ध जमीन सोन्याच्या नांगराने नांगरणार ही दवंडी मिया आमीनपर्यंत देखील पोहचली…मात्र सूड भावनेने मिया अमीन पेटून उठला होता…जिजाऊंच्या या नव्या आव्हानाला सामोरं जाण्यापेक्षा त्याने सगळ्या सराफांना सोन्याचा फाळ घडविण्यास सोने देऊ नये… असे धमकावले होते…आणि जिजाऊंनी योजलेल्या कार्यात अडथळा निर्माण केला होता…. मिया आमीनच्या तंबीमुळे सराफांना इच्छा असूनही सोने देता येत नव्हते…पुणे परगण्यात कुठेच सोने मिळणार नव्हते…


परंतु, एका मागोमाग एक येऊन जिजाऊंची प्रेरणा घेऊन स्वतः गावकरी…स्वराज्यबांधणीच्या कार्यात आपल्या परीने सहभागी होऊन…सोन्याच्या फाळासाठी टीचभर सोने देऊन… आपल्या पदरी स्वातंत्र्याचे दान पाडून घेत होते… जिजाऊ हे सर्व अभिमानाने, समाधानाने आणि आत्मिक आनंदाने पाहत होत्या… फक्त सोन्याचा फाळच काय ..तर संपूर्ण सोन्याचा नांगर घडवणे पुण्याच्या जहागिरीच्या मालकीनबाई असलेल्या जिजाऊंना अशक्य नव्हते,कदापि नव्हते… पण, “त्यामुळे आमची तालेवारी दिसली असती…शिवाय, एक मशाल विझवता येते पण लाखों ठिणग्या पेटून वणवा बनला तर तो विझवणे शक्य नाही…अमिनलासुद्धा विझवता येणार नाही”…असे जिजाऊ जमलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत म्हणतात…

मिया आमीनच्या कारस्थानामुळेच…या स्वराज्यबांधणीच्या या कार्यात लोक सहभाग घडला होता…आणि याच लोकसहभागातून घडवलेल्या नांगराच्या सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून…जिजाऊ आणि शिवबा नांगराविरुद्ध तलवार ही लढाई जिंकण्यासाठी… जीव गेला तरी बेहत्तर असा निर्धार करतात…


आता हा सोन्याचा नांगर गाढवाच्या नांगराचे फराटे कसे पुसून काढणार…आणि आपल्या माणसाच्या मनातले अविश्वासाचे ढेकळ कसे फोडणार…हे पाहण्यासाठी पाहत रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

  • लेखिका पूनम कुचेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here