मिया अमीनची खेळी आली जिजाऊंच्या लक्षात.. लेखमालीका भाग १७ : २३ सप्टेंबर २०२०

0
37

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की, फकरुद्दीन खानाच्या संशयास्पद वागण्यामुळे मिया अमीनला… त्याच्या वफादारीवर संशय आला होता … त्याची परीक्षा घेण्याच्या हेतूने… जिजाऊंच्या हत्येचा कट त्याने फकरुद्दीन खानासमोर उघडपणे मांडला होता…यातून दोन गोष्टी साधायच्या प्रयत्नात असलेला मिया अमीन…कपट खेळू पाहत होता…


त्याचबरोबर झाम्बरे पाटीलवाड्यात झालेला संशयास्पद शिरकाव जिजाऊंच्या लक्षात आला होता…आणि फकरुद्दीन पकडला गेला होता…मात्र,


“मिया अमीनची हुजरेगिरी करत…वेशपालट करून…झाम्बरेवाड्यात जमलेल्या लोकांच्या मनातला.. विश्वास मोडण्यासाठी आणि जिजाऊंच्या विचाराने जोडलेली… एकतेची साखळी तोडण्यासाठी… मी प्रयत्नशील होतो…परंतु,जिजाऊंच्या बोलण्यामुळे…माझे मनपालट कधी झाले हे लक्षातही आले नाही” अशी कबुली तो सर्वांसमोर देतो…

जिजाऊंच्या हत्येचा कट रचला गेल्याने…इमान जागे झालेला फकरुद्दीन… जिजाऊंना सावध करण्यासाठी हर प्रकारे विनवण्या करतो…
त्याच्या बोलण्यावर सहजासहजी…विश्वास ठेवू नये असं बाजी काका म्हणतात…मात्र जिजाऊंच्या जीवाला धोका आहे एवढंच लक्षात आलेले…गोमाजी बाबा, आणि बाजी काका डोळ्यात तेल घालून वाड्यावर गस्त घालत असतात…


मिया आमीनच्या संशयाचा छडा लावण्यासाठी…देशमुख वतनदार फकरुद्दीन खानाच्या पाळतीवर होता आणि आता झाम्बरे वाड्यातून बाहेर पडलेल्या पूर्वाश्रमीच्या पांडबाला पाहून.. मिया अमीनचा संशय सत्यात उतरला होता…


मिया अमीनचा एक डाव यशस्वी झाला होता…झाम्बरेवाड्यात सगळे सज्ज होते…परंतु चिटपाखरूही तिथे फिरकले नव्हते…आणि शिवबांच्या जिज्ञासूवृत्तीने जिजाऊंच्या विचारांना पंख फुटले… मिया अमीन कपट खेळत आहे…हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते… “हल्ल्याच्या भीतीने आपल्याला वाड्यातच गुंतवून… रान माळावर उभ्या असलेल्या…गोधनाची, गुरं वासरांची कत्तल करण्याचा.. हा मिया अमीनचा कावा जिजाऊंनी ओळखला होता”…इतक्यात, भाले, पलीते, तलवारी घेऊन काही हशम माळ रानाकडे निघाले असल्याची खबर गोमाजी बाबा जिजाऊंसह सगळ्यांना देतात…


आता मिया अमीनची चाल लक्षात आलेल्या जिजाऊ…काय पाऊल उचलणार…आणि खंबीर जिजाऊंचा वज्रस्वरूप धीर सुटणार का…हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…

  • लेखिका-पुनम कुचेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here