दिलेला शब्द पाळून…जिजाऊंनी केली लोकांना मदत सुपूर्द..लेखमालिका भाग १८ : २४ सप्टेंबर २०२०

0
39

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
मराठी मुलखाच्या प्रेरणा होऊन लोकोद्धाराचे कार्य हाती घेतलेल्या जिजाऊंची…नियतीनेही जणू प्रेरणा घेतली होती…पुणे वसवून… जिजाऊंनी घेतलेला लोककल्याणकारी वसा..पूर्ण करण्यासाठी नियती हरप्रकारे साथ देत होती…

वारंवार मिया अमीनचे जिजाऊंविरुद्धचे कारस्थान हाणून पाडून जिजाऊंच्या बाजूने कौल देत होती…लोकांचे मेले इमान जागे करत होती…आणि अश्यातच मिया अमीनचा विश्वासू असलेल्या..फकरुद्दीन खानाला त्याच्या मराठी मनाने साद घातली होती…जिजाऊंच्या प्रयत्नांनी मिया आमीनच्या दरबारीच जणू मराठी आत्मसन्मानाचे आणि स्वाभिमानाचे रोप त्याच्या दहशतीचा खडक फोडून बेफिकिरीने अंकुरले होते…
झाम्बरेवाड्यात येऊन..


जिजाऊंच्या जीवाला धोका आहे ही खबरही त्यानेच दिली होती…मात्र ही मिया अमीनची हुलकावणी असून… माळावरच्या गुरा जनावरांना इजा पोहचवण्यासाठी त्याने ही चाल खेळली आहे हे जिजाऊंच्या लक्षात आले होते…


त्यांनी मोठया आशेने…बाजी काका आणि गोमाजी बाबांना लवकरात लवकर माळावर पोहचून जनावरांची सुरक्षितता पहा..असे सांगितले…


जिजाऊंच्या काळजाचा पीळ लक्ष्यात येताच, “काहीही करू पण उद्या लोकांना वाटण्यास जनावरे शाबूत ठेवू…हा शब्द आहे या बाजी पासलकराचा” असा विश्वास देऊन वाड्याबाहेर पडतात…मुळातच अनुभवी पिंड असलेल्या बाजी काकांच्या साथीने जिजाऊंच्या मनाला उभारी मिळते…परंतु खूप वेळ जाऊनही काहीच खबर न आल्यामुळे…जिजाऊ चिंताक्रांत होत्या…लोकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे..आणि अर्थातच त्यांच्याचसाठी जिजाऊंनी पुकारलेल्या बंडामुळे… लोकांना त्रास सहन करावा लागत होता… त्यांच्यातल्या स्वाभिमानाला जागे करण्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता…


तर दुसरीकडे, फकरुद्दीनचा पांडुरंग झालेला.. देशमुख वतनदाराच्या तलवारीच्या धारेखालून निसटला होता…आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्यापुढे जीवही न्यूनतम असतो, त्याच्यामुळे धाडस नसानसांत वाहतं होतं… याचं उदाहरण फकरुद्दीन म्हणजेच पांडुरंग झाला होता…
“आमीनकडे केवढा तो जमाव आणि आपल्याकडे टोकडीशी शिबंदी..कसं करावं, काय करावं” अश्या विचाराने जिजाऊंचा धीर आता सुटत चालला…असताना शिवबा पुढे होऊन माळावर जायला निघाले…


आली रात्र वैऱ्याची होती.. म्हणूनच झाम्बरेवाड्यातच सुरक्षित जिजाऊंच्या मनाला काळजीच्या इंगळ्या डसत होत्या…मुक्या जनावरांचा भाषेच्या जिभा फुटून केलेला कल्पनेतील.. आक्रोश जिजाऊंच्या मनाला आणि निर्धाराला… भुंग्यासारखा पोखरत होता…कारण ही शेवटची संधी होती…लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची…आणि जिजाऊंना ती दवडायची नव्हती…

सकाळी मोठया आशेने, मोठ्या अपेक्षेने उपस्थित राहिलेल्या…एकमुखी जयकार करणाऱ्या लोकांना.. जिजाऊ सारे बळ एवटून उदभवलेला… सारा प्रकार सांगणार असतानाच.. गोमाजी गोमाजी बाबा, बाजी काका, शिवबा, झाम्बरे पाटील सारेच मोठ्या उत्साहात तिथे येतात…
पेटते पलीते जनावरांच्या कळपात टाकून मिया आमीनचा दुसरा हेतू…साध्य करणाऱ्या हशमांना शिताफीने थांबवून…


“ऐन वेळी फकरुद्दीन खानाच्या… पांडुरंग मनातला… पांडुरंग जागा झाला आणि त्याने गुरं राखली”…हे सांगताना बाजी काकांचा उर अगदी भरून आला होता… आणि जिजाऊंच्या मनात स्फूर्तिचं उधाण आलं…


सगळ्यांना ठरल्याप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे मदत सुपूर्द करून जिजाऊंनी सगळ्यांचा पुन्हा एकदा विश्वास संपादन केला होता…मात्र, या आनंदातही विरजण टाकण्यासाठी… पुन्हा पदरी हार पडलेल्या…चवताळलेल्या… मिया अमीनने पांडबाला पकडून…त्याचा मदतीचा हात कलम करून…झाम्बरे वाड्यावर पाठवून…पुन्हा एक निष्पाप अन्यायग्रस्त केला होता…


आता निष्पाप लोकांना सहन करावा लागणारा त्रास…जिजाऊंना कोणता निर्णय घेण्यास भाग पाडेल… हे पाहण्यासाठी… पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि… रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…
लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here