जिजाऊंचे मिया अमीनला नवे आव्हान… लेखमालिका भाग १९ : २५ सप्टेंबर २०२०

0
32

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या 25 सप्टेंबरच्या भागात आपण पाहिलेत की,
मिया आमीनच्या हैदोसामुळे लोकांचे… झालेले नुकसान भरून काढण्यासाठी… दिलेला शब्द पूर्ण करत लोकांच्या नुकसानाची भरपाई आणि त्यांच्या उपजीविकेचे साधनस्वरूप… जनावरे तसेच अन्य सामग्रीची पूर्तता करून.. जिजाऊंनी लोकांचा विश्वास… सार्थ ठरवला होता…परंतु, मिया अमीनने फकरुद्दीनचा हात कलम केल्यामुळे…
जिजाऊंच्या आनंदावर विरजण पडले होते…


लोकांना स्वावलंबी बनवून…पुण्याच्या मातीला मोकळा श्वास घेता यावा…,ज्या पुण्याने मसनवटीचे जीवन जगले होते… त्या भूमीत चैतन्य नांदावे यासाठी जिजाऊंनी स्वतःच्या जीविताची तमा ही बाळगली नव्हती…परंतु, “लोकांना फक्त आपल्यामुळे त्रास सहन करावा लागतोय…परिवर्तनाच्या संघर्षात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना जीव गमवावा लागला… हे असं कधीपर्यंत चालणार… आम्ही कशानेही बधत नाही..म्हणून मिया आमीन आम्हाला झुकवण्यासाठी…नमवण्यासाठीच लोकांना त्रास देतोय..”.
“आता आता लोकांच्या मनातला आत्मविश्वासाचा कोंब कोंबारला आहे पण त्या कोंबाला बळकटी मिळायच्या आधीच मिया आमीन तोडू पाहत होता…


…हे कसं थांबवायचं…काय करावं”…अशा विचारांनी जिजाऊंच्या मनाला ढवळून काढलं होतं… आणि यासाठी पुणे सोडून जाणे हा एकमात्र उपाय जिजाऊंनी मोठ्या निर्धाराने घेतला होता…यातुनच, आपण पुण्याच्या भूमीत जे आत्मविश्वासाचे, स्वाभिमानाचे, एकीचे बीज पेरले आहे…ते कोंबरले बीज मिया आमीनच्या भीतीने मोडणार की मनगटी आलेल्या बळकटीच्या जोरावर दिमाखात उभं राहणार…हे जिजाऊंना पहायचे होते…
तर दुसरीकडे,


जिजाऊ पुणे सोडणार ह्या विचारानेच हरखलेल्या.. मिया अमीनचा अहंकार बेडूक फुगुन बैल व्हावा तसा पुन्हा निर्ढावला होता…पुन्हा दहशत पसरवून… पुण्याला उध्वस्त करून झालेल्या अपमानाचा सूड घेण्याची जय्यत तयारी त्याने मनात केली होती… तर,


परिवर्तनाचा सुसाट वारा दहशतीचा चोगा घालून… अथक परिश्रमाने वसवलेल्या पुण्यात… अंकुरलेल्या लोकबीजाला… त्यांच्याच सक्षमतेचे दर्शन घडवण्यासाठी… पुण्याच्या भाग्यभवानीने लोकवस्तीत धाडला होता… मात्र,
एकीच्या मुळांनी माती घट्ट धरली होती आणि आत्मविश्वासाचे अंकुर…पुण्याच्या भूमीत… दहशतीच्या वाऱ्याला कापत…स्वाभिमानाने सक्षमपणे डौलत होते…


लोकांनी एकी ही त्यांची ताकद जाणली होती…हे पाहून जिजाऊंच्या मनातली चिंता दूर झाली होती…पुणे वसवून तिथला कार्यभाग साधून…महाराज साहेबांच्या स्वराज्य स्वप्नाची पायाभरणी करण्यासाठी जिजाऊंनी पुण्यात मुक्काम ठोकला होता…परंतु, आता पुण्याचा निर्धास्तपणे निरोप घेऊन जिजाऊ…मिया अमीनला नवे आव्हान देत…इतके दिवस, आपल्या अंगणात विस्तव फेकणाऱ्या अमीनच्याच शिरवळ ठाण्यापासून अगदी जवळ असलेल्या खेडबारेला स्वतः आग बनून ठाण मांडून राहण्याचा निर्णय घेतात…जिजाऊंना अडवू पाहणाऱ्या लोकांना…एकी करून राहण्याचा…कोणी त्रास दिला तर आरे ला कारे करण्याचा आणि वेळप्रसंगी परजल्या हत्याराला उगारून तुटुन पडण्याचा सल्ला देऊन त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला होता…


जिजाऊ एक दिव्य पार पाडून स्वस्थ बसणाऱ्या नव्हत्या…त्यांना स्वराज्याचा सूर्योदय पाहण्यासाठी.. एक एक पायरी वर चढायची होती…आणि त्यासाठी जिजाऊ शिवबांना घेऊन खेडबाऱ्याकडे मार्गस्थ झाल्या होत्या…पुणे सोडण्याचा निर्णय हा लढाई अर्धवट सोडण्यासाठी घेतलेला नसून लोकांच्या सुरक्षिततेच्या दूरदृष्टीने घेतलेला निर्णय तर होताच..
पण मिया आमीनच्या अहंकाराला भस्मसात करण्यासाठी घेतला होता…


आता खेडबाऱ्यात आव्हान म्हणून राहायला आलेल्या जिजाऊ…मिया अमीनला कसे गर्दीस मिळवणार हे पाहण्यासाठी पहात रहा…स्वराज्यजननी जिजामाता… सोम-शनि…रात्री 8:30 वाजता…फक्त सोनी मराठीवर…
लेखिका-पुनम कुचेकर, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here